क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीत निवडणुकीच्या जेवणावळीवर बंदी-- येडेमच्छिंद्रचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 08:08 PM2017-10-07T20:08:29+5:302017-10-07T20:12:30+5:30
शिरटे (जि. सांगली) : क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असणाºया येडेमच्छिंद्र येथील युवक व तंटामुक्त समितीने निवडणुकीच्या जेवणावळींवर बंदी
निवास पवार
शिरटे (जि. सांगली) : क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असणाºया
येडेमच्छिंद्र येथील युवक व तंटामुक्त समितीने निवडणुकीच्या जेवणावळींवर
बंदी घातली आहे. निवडणूक लढविणाºया कोणत्याही उमेदवाराने गावात अथवा
बाहेर कोठेही जेवणावळ घातली तर त्याला पन्नास हजार रुपये दंड करण्याचा
निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या रिंगणातील सर्वांनीच
या निर्णयाचे स्वागत केले आहे.
येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे सरपंच पदासाठी दुरंगी, तर सदस्यपदासाठी
तिरंगी लढत होत आहे. सत्ताधारी जयंत क्रांती ग्रामविकास पॅनेल,
जोतिर्लिंग ग्रामविकास पॅनेल व क्रांतिसिंह नाना पाटील ग्रामसुधार युवक
पॅनेलमध्ये तिरंगी लढत होत आहे.
अर्ज माघारीनंतर निवडणुकीत रंग येऊ लागला आहे. जेवणावळी कशा होणार, कोठे
होणार, कोणता उमेदवार कोणत्या धाब्यावर जेवण देणार, अशी चर्चा सुरू
असतानाच, युवकांनी एकत्र येत जेवणावळीवर बंदी घालण्याबाबत तंटामुक्त
समितीशी चर्चा केली. युवकांच्या या निर्णयाचे स्वागत करीत तंटामुक्त
समितीनेही त्याला दुजोरा दिला.
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार,
दि. ७ रोजी झालेल्या युवक, उमेदवार व पॅनेलप्रमुखांच्या बैठकीत निवडणूक
काळात कोणत्याही उमेदवाराने गावात, शेतात अथवा बाहेर कोठेही मतदारांना
जेवण दिल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पन्नास हजार रुपयांचा दंड
ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अॅड. संग्राम पाटील, शरद पाटील
(नांगरे) व संजय पाटील यांनी पॅनेलप्रमुख या नात्याने झालेल्या ठरावावर
सह्या केल्या.
या निर्णयाचे वृत्त वाºयासारखे गावात पसरले. यामुळे चंगळवादी मतदारांची
गोची झाली, तर सूज्ञ मतदारांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे.
क्रांतिसिंहांच्या जन्मभूमीत निवडणूक काळात जेवणावळीवर बंदी घालण्यात आली
आहे. जेवणावळीतूनच वादविवाद होत असतात. अनिष्ट घटना घडत असतात. हा निर्णय
घेण्यामध्ये युवकांचा सिंहाचा वाटा आहे. तिन्ही पॅनेलचे प्रमुख, सर्व
उमेदवार या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करतील, अशी खात्री आहे.
- जयसिंग पाटील, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्त समिती, येडेमच्छिंद्र