बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल
By admin | Published: October 4, 2014 11:46 PM2014-10-04T23:46:37+5:302014-10-06T00:17:28+5:30
बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल
संगमेश्वर : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर येथील बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होऊन नागरिकांनी विविध वस्तू खरेदी करत दसऱ्याचा आनंद द्विगुणित केला. मात्र दुसरीकडे शेतमालास यंदा योग्य तो भाव नसल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत त्याचा दुष्परिणामही बाजारपेठेवर दिसून आला. त्यामुळे दसरा सण येथील बाजारपेठेसाठी संमिश्र ठरला.
सण-उत्सव आणि शुभमुहूर्तावर खरेदी करण्याची भारतीय नागरिकांची मानसिकता आजही मोठ्या प्रमाणात कायम आहे. विशेषत: सोने-चांदी व दागिने खरेदीत हे दिसून येते. दसऱ्याच्या मुहूर्तावर येथील सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली. दुपारनंतर येथील सराफ बाजारात मोठी गर्दी होती. सोन्याचा दर प्रतितोळा २७ हजार ५०० रुपये होता.