Sangli: अबब ! बिळाशीत पडली परातीएवढी मोठी गार, ढगफुटीसदृश्य पावसाने ओढे-नाले वाहू लागले

By हणमंत पाटील | Published: May 24, 2024 01:04 PM2024-05-24T13:04:55+5:302024-05-24T13:06:24+5:30

बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथे गेले चार दिवस सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी दुपारी अचानक ...

Big hail fell in Bilashi sangli, streams and rivers started flowing with rain like cloudburst | Sangli: अबब ! बिळाशीत पडली परातीएवढी मोठी गार, ढगफुटीसदृश्य पावसाने ओढे-नाले वाहू लागले

Sangli: अबब ! बिळाशीत पडली परातीएवढी मोठी गार, ढगफुटीसदृश्य पावसाने ओढे-नाले वाहू लागले

बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथे गेले चार दिवस सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी दुपारी अचानक मुसळधार पाऊस कोसळत होता. ढगफुटीसदृश्य या पावसाने ओढे-नाले वाहू लागले. याच दरम्यान वीरवाडी येथील शाहीर सुरेश पाटील यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे पत्र्यावर मोठी गार आदळली. 

एवढा मोठा आवाज कशाचा म्हणून घरातील लोक जाऊन बघतात तर काय परातीएवढी मोठी गार..ही गार बघताच उचलून त्यांनी परातीत ठेवली. एवढी मोठी गार पडल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सुरेश पाटील म्हणाले, माझ्या सत्तर वर्षांच्या आयुष्यात ही अशी मोठी गार मी पहिल्यांदा पाहिली. ही गार घराच्या छपरावर पडली असती तर छप्पर फोडून ती गार घरात आली असती, परंतु सुदैवाने सदरची गार पाठीमागे उघड्या परड्यात पत्र्यावर आदळली, त्यामुळे कोणतीही जीवितहानी व नुकसान झाले नाही. ही गार बघण्यासाठी वीरवाडीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

सात किलो वजनाची गार..

सुमारे सहा ते सात किलो वजनाची बर्फाची लादी असेल एवढ्या आकाराची ही गार होती. पाऊस थांबल्यानंतर बराच वेळ ही गार पाहण्यासाठी लोक येत होते. तासाभराने ही गार विरघळून गेली. परंतु या गारीची परिसरात चांगली चर्चा सुरू आहे.

Web Title: Big hail fell in Bilashi sangli, streams and rivers started flowing with rain like cloudburst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.