जैव वैद्यकीय कचरा टाकला घंटागाडीत, सांगलीतील हॉस्पिटलकडून दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 02:40 PM2021-04-20T14:40:48+5:302021-04-20T15:06:14+5:30
CoronaVIrus Sangli Hospital : शहरातील शिंदे मळ्यातील अहिल्यादेवी होळकर चौकात असलेल्या दुदनकर मल्टी स्पेशालिटी सेंटरने मोठ्या प्रमाणावर जैव वैद्यकीय कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीत टाकल्याबद्दल दुदनकर हॉस्पिटलवर महापालिकेने कारवाई केली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे आणि स्वछता निरीक्षक अतुल आठवले यांनी हॉस्पिटलकडून एक लाख रुपये दंड वसूल केला.
संजयनगर/सांगली : शहरातील शिंदे मळ्यातील अहिल्यादेवी होळकर चौकात असलेल्या दुदनकर मल्टी स्पेशालिटी सेंटरने मोठ्या प्रमाणावर जैव वैद्यकीय कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीत टाकल्याबद्दल दुदनकर हॉस्पिटलवर महापालिकेने कारवाई केली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे आणि स्वछता निरीक्षक अतुल आठवले यांनी हॉस्पिटलकडून एक लाख रुपये दंड वसूल केला.
आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. या भागामध्ये या हॉस्पिटलकडून कचरा बाहेर टाकला जात असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली होती. त्यानुसार महापालिकेने ही कारवाई केली. हॉस्पिटलचे चालक डॉ. महेश दूधनकर यांच्याकडून एक लाख रुपयाचा दंड स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांनी वसूल केला.