जिल्हाधिकारी कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी--लेटलतिफांना बसणार चाप :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:07 PM2017-09-29T23:07:58+5:302017-09-29T23:15:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अधिकाºयांच्या मनमानी कारभाराला शिस्त लावण्यासाठी चार ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांना दौºयावर असल्याचे सांगून दांड्या मारता येणार नाहीत. कारण, दहा तहसील कार्यालयांच्या ठिकाणीही बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, नागरिकांना गतिमान प्रशासन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांना शिस्त लावण्यात येणार आहे.
कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी दौºयावर असल्याचे सांगून दांड्या मारत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक वेळा कर्मचारी, अधिकारी कार्यालयात दिसत नाहीत. अधिकारी आणि कर्मचाºयांच्या दांड्या मारण्याला लगाम घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील चार ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसविण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचाºयांना येताना आणि जाताना हजेरी द्यावी लागणार आहे. दौºयावर असेल त्यावेळी बायोमेट्रिक हजेरी यंत्राचा वापर करूनच जायचे आहे. ज्या तहसील कार्यालयात कर्मचारी दौºयावर असेल, तेथील यंत्रावर हजेरीची व्यवस्था केली आहे. या आधुनिक यंत्रामुळे लेटलतिफ अधिकारी, कर्मचाºयांवर निर्बंध बसणार आहेत.
जप्त वाळूचे : लिलाव काढणार
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाने विशेष मोहीम राबवून अवैध वाळूच्या साठ्यांवर कारवाई करून ती जप्त केली आहे. या वाळूचा येत्या आठ दिवसात लिलाव काढण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून होणाºया अवैध वाळू वाहतुकीविरोधात सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मी एकत्रित मोहीम पुढील महिन्यात राबविणार असल्याचे विजय काळम-पाटील यांनी सांगितले.
प्रलंबित फायलींपासून १० कोटींचा महसूल
जिल्हाधिकारी कार्यालयात महार वतनाच्या एक हजार फायली प्रलंबित असून त्या निकाली काढण्यासारख्या आहेत. या फायलींचा प्रश्न सोडविण्याच्या सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना दिल्या आहेत. या फायली निकाली काढल्यामुळे नागरिकांची तर गैरसोय दूर होणार आहेच, शिवाय राज्य शासनाला जिल्ह्यातून दहा कोटींचा महसूल मिळण्यास मदत होणार आहे. उर्वरित आठ विभागांच्या प्रलंबित फायलीही येत्या महिन्याभरात निकाली काढणार असल्याचेही विजय काळम-पाटील यांनी सांगितले.
भेसळ करणाºयांवर कठोर कारवाई
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची मोठी उलाढाल होते. या पार्श्वभूमीवर तेल, खवा अशा पदार्थांमध्ये मोठ्याप्रमाणात भेसळ होण्याची शक्यता आहे. म्हणूनच संबंधित विभागाच्या अधिकाºयांना तातडीने जिल्ह्यातील दुकाने आणि उत्पादन होणाºया ठिकाणांची तपासणी करून अहवाल देण्याची सूचना दिली आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यास अचानक तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाºयांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी सांगितले.