बिराेबा देवस्थान परिसराचा विकास करणार : मानसिंगराव नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:41 AM2020-12-16T04:41:17+5:302020-12-16T04:41:17+5:30
शिराळा : बिरोबा देवस्थान व परिसराचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. शिराळा येथील ...
शिराळा : बिरोबा देवस्थान व परिसराचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
शिराळा येथील बिरोबा मंदिरात शिराळा तालुका धनगर समाजाच्यावतीने आमदार मानसिंगराव नाईक व महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांचा सत्कार केला.
यावेळी नाईक म्हणाले, शिराळा येथील बिरोबा मंदिर हे धनगर समाजाचे श्रद्धास्थान आहे. त्याचा व परिसराचा विकास साधणे लोकप्रतिनिधी या नात्याने कर्तव्य आहे. भविष्यात त्याबाबत निश्चितच पाठपुरावा केला जाईल. चिमणभाऊ डांगे यांची महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ते या पदाला व धनगर समाजाला निश्चित न्याय देतील, याची खात्री आहे.
प्रारंभी माजी प्राचार्य माणिक लवटे यांनी स्वागत केले. ‘विश्वास’चे संचालक बिरुदेव आंबरे, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे एस. वाय. यमगर व माजी प्रा. आनंदराव गावडे यांनी आमदार नाईक व प्रदेशाध्यक्ष डांगे यांचा सत्कार केला.
यावेळी माजी प्राचार्य माणिक लवटे, आबासाहेब गावडे, लक्ष्मण पावणे, सुनील मालगुंडे, सुनील व राजाराम तांदळे, बंडगर पुजारी आदी उपस्थित होते. भीमराव ताटे यांनी आभार मानले.