मिरजेत बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:25 AM2021-04-15T04:25:05+5:302021-04-15T04:25:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मिरज : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरजेत विविध पक्ष संघटनांतर्फे पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरजेत विविध पक्ष संघटनांतर्फे पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादीतर्फे रक्तदान शिबिर जिलेबी व पुस्तके वाटप करण्यात आले.
भाजपतर्फे आमदार डॉ. सुरेश खाडे, प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक विवेक कांबळे यांनी पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी रविकांत साळुंखे, अश्विनी पाटील, बाळासाहेब कांबळे, सागर वनखंडे, राज कबाडे, उमेश हारगे, अभिरूप कांबळे, सुमेध ठाणेदार व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
रिपब्लिकन यूथ फोर्सतर्फे मिरज तालुकाध्यक्ष परशराम कोळी व शहर अध्यक्ष शाबुदिन शेख यांनी अभिवादन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे, सचिन कांबळे, सागर वाघमारे, मेहबूब शेख, सतीश शिकलगार, सुभाष दबडे, सुरेश कांबळे, बबन अलगुरे, प्रकाश कांबळे, गणेश पडवळे, विकास कांबळे, अन्वर पीरखान, प्रणव कांबळे, अपूर्वा कांबळे, कृतिका गाडे, गौतम कांबळे उपस्थित होते.
राष्ट्रवादीतर्फे शहर जिल्हा सरचिटणीस जैलाब शेख यांनी अभिवादन केले. जिल्हा सरचिटणीस डॉ. रवी गवई, नितेश वाघमारे, नंदू कांबळे, विजय बल्लारी, प्रभाकर नाईक, गौस मुलाणी, योगेंद्र कांबळे, अमित शिंदे, अविनाश कांबळे, हरीश कोलप उपस्थित होते. संघर्ष सफाई कर्मचारी संघटना व शिवसेनेतर्फे डॉ. महेशकुमार कांबळे यांनी पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. संघर्ष कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष शरद सातपुते, कार्याध्यक्ष राजू पाटील, शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, विजय कात्राळे, राकेश सरवदे, राजू धेंडे, ओंकार जोशी, मयूर कांबळे, सनी कांबळे उपस्थित होते. राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी पुतळ्यास अभिवादन केले. याप्रसंगी कार्याध्यक्ष गंगाधर तोडकर, रुपेंद्र जावळे, प्रवीण कांबळे, ॲड. पूजा शिंगाडे, पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, शशिकांत चव्हाण उपस्थित होते. यावेळी लहान मुलांना डाॅ. आंबेडकर यांची पुस्तके व जिलेबी वाटप करण्यात आले. जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर पार पडले.