बिसूरची महिला अपघातात ठार

By Admin | Published: January 25, 2016 01:08 AM2016-01-25T01:08:52+5:302016-01-25T01:09:20+5:30

मुलगी जखमी : रॉड तुटल्याने ट्रॉलीची धडक

Bisoor woman killed in an accident | बिसूरची महिला अपघातात ठार

बिसूरची महिला अपघातात ठार

googlenewsNext

 सांगली : ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये असलेला रॉड तुटल्याने ट्रॉली रस्त्याकडेला थांबलेल्या महिलेला जाऊन धडकल्याने ती जागीच ठार झाली. सुनीता रामदास यादव (वय ३०, रा. बिसूर, ता. मिरज) असे या महिलेचे नाव आहे. बुधगाव नाक्यावर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता हा अपघात झाला. यामध्ये सुनीता यांची मुलगी आरती (अडीच वर्षे) ही गंभीर जखमी झाली आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुनीता यादव या मुलीसोबत बुधगाव येथे आठवडा बाजार असल्याने आल्या होत्या. बाजारात खरेदी केल्यानंतर त्या बिसूरला जाण्यासाठी बुधगाव नाक्यावरील बस थांब्यावर उभा होत्या. त्यावेळी सांगलीकडे ट्रॅक्टर-ट्रॉली (क्र. एमएच १० एस १६०२) निघाली होती. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये असलेला रॉड अचानक तुटल्याने ट्रॅक्टर पुढे गेला व ट्रॉली सुनीता यादव यांच्या अंगावर जाऊन आदळली. यामध्ये त्या जागीच मरण पावल्या. आरतीला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली आहे. विच्छेदन तपासणीनंतर सुनीता यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल. (प्रतिनिधी)

Web Title: Bisoor woman killed in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.