भाजपमुळे विकास गतिमान

By admin | Published: August 26, 2016 10:15 PM2016-08-26T22:15:41+5:302016-08-26T23:15:17+5:30

पृथ्वीराज देशमुख : कडेगाव येथे तिरंगा रॅलीचा सांगता समारंभ

BJP accelerates development | भाजपमुळे विकास गतिमान

भाजपमुळे विकास गतिमान

Next

नेवरी : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी योगदान दिले आहे. त्यांचे स्मरण व त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी नव्या पिढीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिरंगा रॅलीमुळे मिळाली आहे. असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले.
कडेगाव तालुक्यातील तिरंगा रॅलीची सांगता कडेगाव येथे करण्यात आली. यावेळी खासदार संजयकाका पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरूड, तालुकाध्यक्ष हिम्मतराव देशमुख उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, स्वातंत्र्यसैनिकांचे उचित स्मरण, देशाच्या सीमेवर रक्षणासाठी काम केलेले माजी सैनिक व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याची संधी या रॅलीमुळे आली आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. शासनाने घेतलेले निर्णय व शासकीय योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तरुणांनी भाजपच्या झेंड्याखाली काम करावे.
रामापूर, देवराष्ट्रे, मोहिते वडगाव, चिंचणी, वांगी, शिवणी, वडियेरायबाग, आंबेगाव, नेवरी, भिकवडी, येतगाव, खेराडेवांगी, रायगाव, शाळगाव, विहापूर, शिवाजीनगर, खंबाळे, अपशिंगे, कोतवडे, नेर्लीमार्गे कडेगाव येथे रॅलीची सांगता झाली.
प्रास्ताविक धनंजय देशमुख यांनी केले. यावेळी शिवाजीराव देशमुख, तानाजी देसाई, मोहन माळी, तानाजी रास्कर, दादासाहेब रास्कर, मोहनसिंग रजपूत, आप्पासाहेब मोरे या माजी सैनिकांचा, ज्येष्ठ नागरिक विष्णू रोकडे तसेच राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रसेन देशमुख, वसंतराव गायकवाड, शिवाजीराव देशमुख, प्रकाश निरंजन, ज्ञानेश्वर शिंदे, पी. के. गायकवाड, रमेश पवार, धोंडीराम महिंद, तानीज महिंद, विवेक भस्मे, श्रीजय देशमुख, कुमार कवठेकर उपस्थित होते. शिवाजी चन्ने यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: BJP accelerates development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.