आरवडेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या सरपंचाचे डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:47 PM2017-10-18T23:47:52+5:302017-10-18T23:47:56+5:30

BJP activists at Rivade broke the head of NCP's Sarpanch | आरवडेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या सरपंचाचे डोके फोडले

आरवडेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या सरपंचाचे डोके फोडले

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : आरवडे (ता. तासगाव) येथे राजकीय वादातून आमदार सुमनताई पाटील व खासदार संजयकाका पाटील यांच्या गटात बुधवारी जोरदार हाणामारी झाली.
खासदार गटाचे संभाजी मस्के यांनी केलेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले. जखमींना तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर, रुग्णालयात घुसून पुन्हा त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी भाजपा समर्थकांनी केलेल्या दगडफेकीत सरपंच युवराज पाटील गंभीर जखमी झाले. या मारहाणीत काठ्या, गज, दगड व रिव्हॉल्व्हरचा वापर केला. दरम्यान, बंदोबस्तावरील पोलिसांनाही कॉलर पकडून शिवीगाळ केल्याने गावात तणाव आहे. आमदार सुमनताई पाटील यांनी रुग्णालयास भेट देऊन जखमींची विचारपूस केली. जखमींमध्ये सरपंच युवराज पाटील, किसन रंगराव कुंभार, राहुल किसन कुंभार, रामचंद्र दामोदर कुंभार यांचा समावेश आहे.
सरपंच पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरवडेत आमदार गटाची सत्ता आली असून खासदार गट पराभूत झाला आहे. आमदार गटाकड़ून लता किसन कुंभार विजयी झाल्या. याचा राग विरोधी गटाच्या संभाजी मस्के व अन्य उमेदवारांना होता. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता कुंभार यांचे पती किसन कुंभार व मुलगा राहुल कुंभार गावातील बसस्थानक चौकातील मोटार दुरुस्तीच्या दुकानात बसले होते. यावेळी मस्के आपल्या समर्थकांसह तिथे आले व त्यांनी कुंभार पिता-पुत्रास काठ्या व दगडाने मारहाण केली. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. त्यांची आरडाओरड ऐकून गावात बंदोबस्तासाठी असणारे पोलिस व काही तरुणांनी बसस्थानक चौकात धाव घेऊन हाणामारी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हल्लेखोरांनी पोलिसांचीही कॉलर धरून त्यांना अर्वाच्च शिवीगाळ केली. यादरम्यान, हाणामारीची छायाचित्रे काढणाºयालाही बेदम मारहाण करण्यात आली.
युवराज पाटील व अविनाश पाटील यांना पाहून मस्के व त्यांच्या समर्थकांनी पुन्हा गोंधळ सुरू केला. मस्के याने युवराज पाटील यांना शिवीगाळ करीत डोक्यात दगड घातला. यात ते गंभीर जखमी झाले. वाद थांबवा म्हणून सांगणाºया अविनाश पाटील यांच्या दिशेनेही दगड फेकत मस्के याने अंगावर धावून येत शिवीगाळ केली.
दरम्यान, सरपंच पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच त्यांचे समर्थक रुग्णालयाकडे धावले. जमावाने तेथे उभ्या केलेल्या मोटारीवर दगडफेक केली.
गावात तणाव : घटनेनंतर रुग्णालय परिसर व आरवडे गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: BJP activists at Rivade broke the head of NCP's Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.