भाजप-काँग्रेसची खडाजंगी--मिरज पंचायत समिती सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:22 AM2017-10-14T00:22:23+5:302017-10-14T00:23:32+5:30
मिरज : मिरज पंचायत समिती सभेत शासकीय जमिनीवर अतिक्रमणाबाबत सलगरेत काँग्रेस पदाधिकाºयांवर कारवाई करणारे ग्रामविकासमंत्री आमदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरज पंचायत समिती सभेत शासकीय जमिनीवर अतिक्रमणाबाबत सलगरेत काँग्रेस पदाधिकाºयांवर कारवाई करणारे ग्रामविकासमंत्री आमदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत काँग्रेस सदस्यांनी ग्रामविकास मंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी केली. मात्र सभापतींनी ठरावास नकार दिल्याने काँग्रेस व भाजप सदस्यांत शाब्दिक चकमक झाली. आरक्षित जमीन हडप केल्याप्रकरणी आ. खाडे यांच्या संस्थेवर कारवाईची जोरदार मागणी काँग्रेस सदस्यांनी केली.
सभापती जनाबाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची सभा पार पडली. सभेत काँग्रेसचे अनिल आमटवणे यांनी मालगाव येथील कुष्ठरोग्यांसाठी आरक्षित असलेली शासकीय जमीन आ. सुरेश खाडे यांच्या शैक्षणिक संस्थेला बेकायदेशीर हस्तांतरित केल्याचा मुद्दा उपस्थित केला. सलगरेत गायरान जमिनीत अतिक्रमणाच्या तक्रारीमुळे काँग्रेसच्या सरपंच व उपसरपंचांना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी अपात्र ठरविण्याची कारवाई केली आहे. मात्र मालगाव येथील कुष्ठरोग्यांसाठी आरक्षित जमीन हडप केल्याबद्दल आ. खाडे यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही.
सलगरे व मालगाव येथील प्रकरणाबाबत वेगवेगळा न्याय देणाºया ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी आमटवणे यांनी केली. यावरून आमटवणे व विक्रम पाटील, राहुल सकळे यांच्यात शाब्दिक चकमक झडली.
राष्टÑवादीचे अजयसिंह चव्हाण यांनीही शासनाची जागा कवडीमोल किमतीने कब्जा करून सामान्यांची लूट सुरू असल्याची टीका केली. भाजपचे किरण बंडगर यांनी मालगाव येथे राष्टÑवादी नेत्यांनी मालगाव दर्ग्याची जागा बेकायदा विक्री केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
सांगली-आष्टा मार्गावर रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडल्याने अपघातांची संख्या वाढली असल्याने रस्ता दुरूस्तीची मागणी जयश्री डांगे व अजयसिंह चव्हाण यांनी केली. तालुक्यात अनेक गावात दिवाबत्ती नादुरूस्त असून याबाबत पंचायत समिती व महावितरण जबाबदारी टाळत असल्याचे किरण बंडगर यांनी सांगितले.
उपसभापती काकासाहेब धामणे यांनी विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे शेतकºयांचा बळी गेला असल्याने कृषी विभागाने याबाबत शेतकºयांचे प्रबोधन व उपाययोजनांची माहिती देण्याची सूचना कृषी विभागाच्या अधिकाºयांना केली.
वन विभागाने लागवड केलेली रोपे अनेक ठिकाणी वाळून जात असल्याचे अजयसिंह चव्हाण यांनी निदर्शनास आणले. सतीश कोरे, रंगराव जाधव, सुमन भंडारे, शुभांगी सावंत, छाया हत्तीकर, गीतांजली कणसे, पूनम कोळी, त्रिशला खवाटे चर्चेत सहभागी होत्या. गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. सभेत माजी उपसभापती रामदास पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली.
काँग्रेस सदस्यांची समजूत काढली
मालगाव येथील जमीन प्रकरणावरून काँग्रेसने आ. खाडे यांना लक्ष्य केले आहे. आजच्या सभेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे काँग्रेस व भाजपला वेगवेगळा न्याय देत असल्याचा आरोप करीत काँग्रेस सदस्यांनी मुंडे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी केली. या ठरावास भाजप सदस्यांनी विरोध दर्शविल्याने शाब्दिक चकमक झाली. उपसभापती काकासाहेब धामणे यांनी, असा ठराव करता येत नसल्याची काँग्रेस सदस्यांची समजूत काढत या विषयावर पडदा टाकला.