आघाडीच्या घोडेबाजाराला भाजपकडून लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:33 AM2021-09-10T04:33:15+5:302021-09-10T04:33:15+5:30

शिंदे म्हणाले, महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीत भाजपकडे बहुमत असतानाही काँग्रेस, राष्ट्रवादीने घोडेबाजार केला. स्थायी समिती सभापती निवडीतही हाच उद्योग ...

BJP curbs leading horse market | आघाडीच्या घोडेबाजाराला भाजपकडून लगाम

आघाडीच्या घोडेबाजाराला भाजपकडून लगाम

Next

शिंदे म्हणाले, महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीत भाजपकडे बहुमत असतानाही काँग्रेस, राष्ट्रवादीने घोडेबाजार केला. स्थायी समिती सभापती निवडीतही हाच उद्योग सुरू होता. भाजपच्या सदस्यांना वेगवेगळ्या ऑफर येत होत्या, त्यांच्यावर राज्यातील सत्तेचा दबाव टाकला जात होता. मात्र, त्याला एकही नगरसेवक बळी पडला नाही. महापालिकेत भाजपचेच बहुमत असून सत्ता आमचीच आहे.

शेखर इनामदार म्हणाले, महापालिका निवडणुकीत जनतेने भाजपला कौल दिला आहे. भाजपनेच खऱ्या अर्थाने शहराच्या चेहरामोहरा बदलण्याचे काम केले आहे. मात्र, गद्दारी करून महापौर पद मिळवलेल्यांनी शहराच्या विकासासाठी काय केले ? आतापर्यंत त्यांनी शासनाकडून एक रुपयाचाही निधी महापालिकेसाठी आणला नाही. खोटी आश्वासने देत त्यांनी गैरमार्गाने सत्ता मिळवली असल्याचा आरोप केला.

चौकट

कोट

शहराच्या विकासाला गती देणार : आवटी

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाच्या सर्व स्थानिक नेत्यांमुळे मला या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू. महापालिका क्षेत्राच्या विकासाला गती देऊ. महापौर निवडीवेळी भाजपशी विश्वासघात झाला. मात्र, त्यानंतर पक्षाने कात टाकली आणि सभापती पद राखण्यात यश मिळविले. - निरंजन आवटी, नूतन सभापती, स्थायी समिती

चौकट

भाजपचीच दमछाक : उत्तम साखळकर

बहुमत असतानाही आठ दिवस नगरसेवकांना डांबून ठेवण्याची वेळ भाजपवर आली. अजेंडा निघण्यापूर्वी सदस्य गायब केले. मतदान होईपर्यंत प्रत्येक नगरसेवकामागे नेते व पहिलवान ठेवले. स्थायी निवडीत भाजपचीच दमछाक झाली. उलट ना व्हीप, ना सहलीवर जात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य एकसंघ राहिले. भाजपच्या कोणत्याही आमिषाला बळी पडले नाहीत. - उत्तम साखळकर, विरोधी पक्षनेते.

Web Title: BJP curbs leading horse market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.