आटपाडीत भाजपचा झेंडा

By admin | Published: February 23, 2017 11:07 PM2017-02-23T23:07:16+5:302017-02-23T23:07:16+5:30

जत --जगतापांची पकड जतवर कायम

BJP flag at Atpadi | आटपाडीत भाजपचा झेंडा

आटपाडीत भाजपचा झेंडा

Next

अविनाश बाड --आटपाडी --जिल्हा परिषदेच्या ४ पैकी ४ आणि पंचायत समितीच्या ८ पैकी ६ जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आटपाडीत भाजपला अच्छे दिन आले आहेत. दिघंची गणात राष्ट्रवादीने घड्याळाची टिकटिक चालू ठेवली आहे. खरसुंडी गणात कॉँग्रेसने विजय मिळविल्याने तालुक्यात राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसने अस्तित्व राखले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख यांनी भाजपत प्रवेश केला. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि देशमुख बंधू एकत्रित लढविलेली ही निवडणूक तालुक्यात भलताच चर्चेचा विषय ठरली होती. आटपाडीत अरुण बालटे २७३१ मताधिक्याने विजयी झाले, तर आटपाडी गणात भाजपचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख १६७१ मताधिक्याने विजयी झाले. शिवसेना आणि स्वाभिमानी विकास आघाडीची युती येथे झाली होती. याशिवाय राष्ट्रवादीचे उमेदवार सादिक आणि अपक्ष उमेदवार विजय सातारकर हे रिंगणात होते. या निवडणुकीला पाटील विरुद्ध देशमुख आणि पडळकर असेही स्वरूप आले होते. दिघंची गटात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत झाली. त्यात दिघंची पंचायत समिती राष्ट्रवादीला मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख यांनी गड राखला. निंबवडे गणातही भाजपचे कमळ फुलले. करगणी गटात भाजप-शिवसेना असा चांगलाच सामना रंगला. पडळकर यांच्या नेतृत्वाखाली येथे वंदना गायकवाड, तर शिवसेनेच्या मनीषा पाटील यांच्यात चुरस झाली. करगणी गटाबरोबरच कौठुळी गणाच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष होते. तिथे भाजपने बाजी मारली. खरसुंडी गटात भाजप पुरस्कृत ब्रह्मदेव पडळकर यांनी कॉँग्रेसचे जयदीप भोसले यांना मात दिली. पण खरसुंडी गणात कॉँग्रेसच्या सारिका भिसे यांच्या गळ्यात विजयश्री पडली. विजयी उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेऊन जल्लोष केला.
 

जगतापांची पकड जतवर कायम
जयवंत आदाटे --जत
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ पैकी सहा, तर पंचायत समितीच्या अठरापैकी नऊ जागांवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करुन आमदार विलासराव जगताप यांनी तालुक्यावरील पकड कायम ठेवण्यात यश मिळविले.
कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष पी. एम. पाटील यांच्या बिळूर जि. प. मतदार संघात त्यांना एकही जागा राखता आली नाही. जनसुराज्य पक्षाचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांचा संख मतदार संघ बालेकिल्ला होता. आता तेथे सत्तांतर झाले आहे. शेगाव गटात प्रकाश भोसले यांची एकहाती वीस वर्षे सत्ता होती. तेथेही सत्तांतर होऊन हा मतदार संघ भाजपकडे गेला आहे. मुचंडी गटात रमेश पाटील यांची एकहाती पंधरा वर्षे सत्ता होती. तेथे राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही. संपूर्ण मतदार संघ कॉँग्रेस पक्षाकडे गेला आहे. उमदी गटात अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर व अ‍ॅड. चन्नाप्पा होर्र्तीकर यांची एकहाती पंधरा वर्षे सत्ता होती. तेथे सत्तांतर होऊन संपूर्ण मतदार संघ कॉँग्रेसकडे गेला. डफळापूर गटातही कॉँग्रेसने एकहाती सत्ता हस्तगत केली आहे.
राष्ट्रवादी व वसंतदादा विकास आघाडीसाठी माजी आमदार प्रकाश शेंडगे, सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, रमेश पाटील आदींनी प्रचार केला, परंतु त्यांना यश मिळाले नाही. सुरेश शिंदे यांनी बंडखोरी करुन डफळापूर, शेगाव व बनाळी गटात उमेदवार उभे केले होते. त्यापैकी शेगाव गणातील एक जागा त्यांना मिळाली आहे. तालुक्यात शिवाजी शिंदे हे शेगाव पंचायत स. मतदार संघातून सर्वाधिक कमी (१२०) मतांनी विजयी झाले आहेत, तर सर्वाधिक मतांनी येळवी गणातून मंगल जमदाडे विजयी झाल्या.

Web Title: BJP flag at Atpadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.