गिरजवड़े सरपंचपदी भाजपा ज्योती शरद गुरव-पाटील बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 03:33 PM2017-10-03T15:33:30+5:302017-10-03T15:35:14+5:30
गिरजवड़े ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून या ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आली आहे. नूतन सरपंचपदी ज्योती शरद गुरव-पाटील यांना बिनविरोध निवडून देण्यात आले आहे. शिराळा तालुक्यात भाजपाने श्रीगणेशा केला आहे.
शिराळा : गिरजवड़े ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून या ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आली आहे. नूतन सरपंचपदी ज्योती शरद गुरव-पाटील यांना बिनविरोध निवडून देण्यात आले आहे. शिराळा तालुक्यात भाजपाने श्रीगणेशा केला आहे.
गिरजवड़े गावाने गेल्या वेळी ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून गावचा विकास साधण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. यावेळी ही निवडणूक होईल की नाही याबाबत सर्वाना शंका होती. मात्र गावातील युवकांनी ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी अखेर पर्यंत प्रयत्न केले. त्याला यश आले.
ग्रामपंचायतीत सदस्य सात जागा व सरपंच अशा एकूण आठ जागा होत्या. पैकी सरपंच पद हे ओबीसी महिलासाठी आरक्षित असल्याने ही जागा भाजपा कार्यकर्त्या ज्योती शरद गुरव-पाटील यांना देण्यात आले. तर इतर सात जागा पैकी मोहन खाशाबा मुळीक, नंदा तानाजी बिळास्कर (भाजपा), इंदुताई जगन्नाथ पाटील, निलेश अशोक एटम, आनंदी हणमंत पवार (राष्ट्रवादी), विजय रघुनाथ पाटील, रुपाली राजाराम बिळासकर (काँग्रेस) असे वाटप करून तेवढेच अर्ज दाखल केल्याने या सर्व निवडी बिनविरोध झाल्या.
अधिकृत निकाल पाच तारखेला निवडणूक विभाग जाहिर करणर आहे. गिरजवड़े ग्रामपंचायतीवर भाजपाचा उमेदवार निवडून आल्याने भाजपात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.