भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 11:53 AM2024-10-04T11:53:57+5:302024-10-04T12:00:24+5:30
Sharad Pawar : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते.
Sharad Pawar ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून खासदार शरद पवार दोन दिवसासाठी सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. काल गुरुवारी (३ सप्टेंबर) रोजी पवार यांची सांगली जिल्ह्यातील काँग्रेस, भाजपातील बड्या नेत्यांनी भेट घेतली. भाजपाचे नेते राजेंद्रआण्णा देशमुख यांनीही भेट घेतली. यावेळी देशमुख यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. याबाबत आज पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पवार यांनी दिलेल्या उत्तराने एकच हशा पिकला.
इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
सांगलीत आज खासदार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने केंद्राचे अभिनंदन केले. तसेच मराठा आरक्षणावरही भाष्य केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारला टोलाही लगावला. यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांनी नेत्यांच्या भेटीगाठीवरुन सवाल केले. पवार यांनी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले.
व्हिडीओ पाहून शरद पवार चकीत झाले
काल खासदार शरद पवार यांना सांगलीत आटपाडीचे भाजप नेते राजेंद्रअण्णाा देशमुख यांनी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. देशमुख यांनी बाहेर येऊन माध्यमांनाही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. यावर आज पत्रकार परिषदेत पवार यांना 'राजेंद्रअण्णा देशमुख यांनी पक्षात प्रवेश केला का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना पवार म्हणाले, आमच्या जुन्या सहकाऱ्यांनी भेटीगाठी घेतल्या असं म्हणाले. यावेळी पत्रकारांनी पवारांना सांगितले की, 'देशमुख यांनी बाहेर येऊन मी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला असं आम्हाला सांगितले आहे. यावेळी पवार यांवी प्रति सवाल करत असं सांगितलं का? म्हणाले. यावेळी पत्रकारांनी पवार यांना राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ दाखवला. पवारही चकीत झाले. यावेळी एकच हशा पिकला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, ही सर्व लोक आमचे जुने सहकारी आहेत. हे लोक भलतीकडे गेले होते. त्यांच्या आता लक्षात आलं की हा रस्ता काही खरा नाही. योग्य रस्ता जो आहे त्या रस्त्यावर गेले पाहिजे हे त्यांना वाटत आहे. त्यांचं स्वागत आहे. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. पुन्हा काम करण्याची त्यांची इच्छा आहे. आपण एकत्र येऊन लोकांच्यासाठी काम करुया, असंही खासदार शरद पवार म्हणाले.