भाजपचे नेते म्हणतात, सांगलीच्या खासदारांचे विरोधकांशी सख्य, सांगलीत कोअर कमिटी बैठकीत तक्रार

By शीतल पाटील | Published: April 21, 2023 07:59 PM2023-04-21T19:59:55+5:302023-04-21T20:00:01+5:30

नारायण राणे यांच्याकडून दखल

BJP leaders say, Sangli MPs are friendly with opposition, complaint in Sanglit core committee meeting | भाजपचे नेते म्हणतात, सांगलीच्या खासदारांचे विरोधकांशी सख्य, सांगलीत कोअर कमिटी बैठकीत तक्रार

भाजपचे नेते म्हणतात, सांगलीच्या खासदारांचे विरोधकांशी सख्य, सांगलीत कोअर कमिटी बैठकीत तक्रार

googlenewsNext

सांगली : भाजपचे खासदार विरोधी पक्षाच्या लोकांना मदत करतात, पक्षवाढीसाठी कसलेही प्रयत्न करत नाहीत, त्यांच्याबद्दल जनतेत नाराजी आहे, अशा तक्रारी शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे करण्यात आला. हा सारा प्रकार भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत घडला. पण यावेळी नेत्यांनी खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता केवळ लोकप्रतिनिधी असा वारंवार उल्लेख केला. बैठकीला खासदार पाटील उशिरा आल्याची संधी पक्षातर्गंत विरोधकांनी साधली. या तक्रारीची दखल घेत राणे यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे अहवाल देणार असल्याचे सांगितले.

सांगली लोकसभा मतदार संघासाठी पक्ष निरीक्षक म्हणून मंत्री राणे यांची नेमणूक केली आहे. त्यांनी शुक्रवारी सांगलीत लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, खा. संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, जेष्ठ नेते मकरंद देशपांडे, नीता केळकर उपस्थित होते.

खासदारांचा भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी फारसा संबध नाही. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीतही त्यांचे फारसे योगदान नाही. भाजप वाढवण्यापेक्षा ते जिल्ह्यात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेत स्वत:चा गट बांधत आहेत. आदी तकारी केल्या. स्थानिक गटबाजीला जास्त महत्व न देता पंतप्रधान मोदी यांच्यासाठी पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणा असा सल्ला राणे यांनी भाजप नेत्यांना दिला. बैठकीस निशिकांत पाटील, संग्राम देशमुख, सम्राट महाडीक, पृथ्वीराज पवार उपस्थित होते.

आपलेच लोक गद्दार

भाजपचे लोकप्रतिधी, नेते व पदाधिकारी यांच्यात समन्वय नाही. पक्षांतर्गत गटबाजी मोठी आहे. मी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढलो. यात एकदा जिंकलो, दोनदा पडलो. माझा पराभव भाजपमधीलच काही गद्दारांमुळे झाल्याचे एका माजी आमदाराने राणे यांना सांगितले.

Web Title: BJP leaders say, Sangli MPs are friendly with opposition, complaint in Sanglit core committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.