Maharashtra Vidhan Sabha 2019: बंडखोरांना थोपविण्याचे भाजप नेतृत्वासमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 03:19 PM2019-10-05T15:19:54+5:302019-10-05T15:22:11+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकेमध्ये कमळ फुलल्यामुळे भाजपमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी झाली. परिणामी जत, शिराळा, इस्लामपूर, सांगली विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली. बंडोबांना थांबविण्याचे मोठे आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर आहे. मिरजेत भाजपच्या बंडखोरालाच काँग्रेस आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी दिली.

The BJP leadership challenges the rebels | Maharashtra Vidhan Sabha 2019: बंडखोरांना थोपविण्याचे भाजप नेतृत्वासमोर आव्हान

Maharashtra Vidhan Sabha 2019: बंडखोरांना थोपविण्याचे भाजप नेतृत्वासमोर आव्हान

Next
ठळक मुद्देबंडखोरांना थोपविण्याचे भाजप नेतृत्वासमोर आव्हाननेत्यांनी छुप्या मार्गाने बंडाचा झेंडा घेतल्याची चर्चा

अशोक डोंबाळे 

सांगली : जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकेमध्ये कमळ फुलल्यामुळे भाजपमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी झाली. परिणामी जत, शिराळा, इस्लामपूर, सांगलीविधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली. बंडोबांना थांबविण्याचे मोठे आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर आहे. मिरजेत भाजपच्या बंडखोरालाच काँग्रेस आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी दिली.

जिल्ह्यातील चार विधानसभा भाजपला, तर चार शिवसेनेला मिळाल्या आहेत. पलूस-कडेगाव मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असताना, तेथील जागा शिवसेनेला गेल्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना धक्का बसला आहे. देशमुख यांच्यावर कार्यकर्त्यांचा बंडखोरीसाठी दबाव होता. पण, अखेरच्याक्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समजूत काढल्यामुळे त्यांनी अर्ज भरला नाही.

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सत्यजित देशमुख यांना शिराळा विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण भाजपने पहिल्याच यादीत शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी जाहीर करून देशमुख गटाला धक्का दिला. पण त्यांची समजूत काढण्यात भाजप नेतृत्व यशस्वी झाले. मात्र तिसरे इच्छुक महाडिक युवाशक्तीचे सम्राट महाडिक यांनी मात्र शिराळ्यातून बंडखोरी केली आहे. महाडिक भाजपमध्ये नसले तरी ते पक्षाच्या निकट असून, त्यांच्या उमेदवारीचा फटका बसणार असल्याने भाजपचे नेते त्यांना थांबवण्यासाठी सक्रिय झाले आहेत.

सांगलीत भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात भाजपचे कवलापूर जिल्हा परिषद गटातील शिवाजी डोंगरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांच्या पत्नी विद्या डोंगरे या बुधगाव (ता. मिरज) जिल्हा परिषद गटात भाजपच्या सदस्या आहेत. ग्रामीण भागात डोंगरे गटाचे वर्चस्व असल्यामुळे त्यांची बंडखोरी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. डोंगरे यांचे बंड थोपविण्यासाठी भाजपच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू होते.

इस्लामपुरात भाजपचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनीही शिवसेना उमेदवार गौरव नायकवडी यांच्याविरोधात अर्ज दाखल केला आहे. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भोसले-पाटील गटामध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष चालू आहे. उमेदवारीच्या माध्यमातून हा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलविरोधी गटाची रयत विकास आघाडी यानिमित्ताने फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे संकेत मिळत आहेत.

खोत यांचे गौरव नायकवडी यांना पाठबळ असल्यामुळे शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यात ते यशस्वी झाले.
जतमध्ये विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्याविरोधात गेल्या वर्षभरापासून एक गट कार्यरत होता.

डॉ. रवींद्र आरळी, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती तम्मनगौडा रवी-पाटील यांनी, भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. पण अखेरच्या टप्प्यात जगताप उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाल्यामुळे डॉ. आरळी यांनी बंडखोरी करुन अर्ज दाखल केला आहे. जगतापविरोधकांना एकत्रित करुन तगडे आव्हान देण्याची त्यांची तयारी सुरु आहे. भाजपचे वरिष्ठ नेते त्यांची मनधरणीच्या प्रयत्नात आहेत.

मिरज विधानसभा मतदारसंघातून सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याविरोधात त्यांचे समर्थक महापालिका नगरसेवक आनंदा देवमाने यांच्या पत्नी शुभांगी देवमाने यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीमध्ये मिरजेची जागा स्वाभिमानीला गेली आहे. स्वाभिमानीने शुभांगी देवमाने यांना उमेदवारी दिली आहे.

खानापूर मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीची उमेदवारी आमदार अनिल बाबर यांना मिळाली आहे. बाबर यांच्याविरोधात आटपाडीतील भाजपचे नेते अमरसिंह देशमुख आणि गोपीचंद पडळकर गटाने छुप्या मार्गाने बंडाचा झेंडा घेतल्याची चर्चा आहे.

 

Web Title: The BJP leadership challenges the rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.