VIDEO: गोपीचंद पडळकरांचा पोलिसांना चकवा; गनिमी काव्यानं घेतली बैलगाडा शर्यत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 08:08 AM2021-08-20T08:08:27+5:302021-08-20T08:16:18+5:30
आटपाडी तालुक्यातील निंबवडे-वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान असलेल्या पठारावर सकाळी शर्यतीचं आयोजन
सांगली : आमदार गोपीचंद पडळकर यांनी पोलिसांना चकवा देत एका रात्रीत पाच किलोमीटरचा दुसरा ट्रॅक बनवून बैलगाड्या शर्यत पार पाडल्या. आटपाडी तालुक्यातील निंबवडे-वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान असलेल्या पठारावर सकाळी शर्यती झाल्या. बैलगाडी शर्यतींवर न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीही आ. पडळकर यांनी बैलांच्या संवर्धनासाठी, सरकारला जाग येण्यासाठी शर्यती भरवत असल्याचे जाहीर केले होते.
सांगली- भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा पोलिसांना चकवा; एका रात्रीत पाच किलोमीटरचा दुसरा ट्रॅक तयार करून घेतली बैलगाडा शर्यत https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/LZSKre0M1R
— Lokmat (@MiLOKMAT) August 20, 2021
यापूर्वी आ. पडळकर यांनी झरे या गावी शर्यती होणार असल्याचं जाहीर केले होते. शर्यती होऊ नयेत यासाठी प्रशासनाने कंबर कसली होती. हजारावर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. झरे गावाकडे येणारे रस्ते बंद केले होते. परिसरातील ९ गावांमध्ये बुधवारपासून संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. मात्र आ. पडळकर यांनी शुक्रवारी गनिमी काव्याने शर्यतींची जागा बदलली. बदललेल्या ठिकाणी त्यांनी शर्यती पार पाडल्या.