सांगलीत भाजपची निदर्शने : तरुणीच्या अत्याचाराविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 03:39 PM2020-12-30T15:39:14+5:302020-12-30T15:41:30+5:30

Ncp Bjp sangli- सत्ता आघाडी, गृहमंत्री आघाडीचा मग राज्यात महिला असुरक्षित का? असा सवाल करीत औरंगाबादमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाचा जाहीर निषेध करत भाजपा युवा मोर्चाच्या वतीने बुधवारी सांगलीतील स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली.

BJP protests: agitation against atrocities against young women | सांगलीत भाजपची निदर्शने : तरुणीच्या अत्याचाराविरोधात आंदोलन

सांगलीत भाजपची निदर्शने : तरुणीच्या अत्याचाराविरोधात आंदोलन

Next
ठळक मुद्देसत्ता आघाडी, गृहमंत्री आघाडीचा मग राज्यात महिला असुरक्षित का?सांगलीत भाजपची निदर्शने : तरुणीच्या अत्याचाराविरोधात आंदोलन

सांगली : सत्ता आघाडी, गृहमंत्री आघाडीचा मग राज्यात महिला असुरक्षित का? असा सवाल करीत औरंगाबादमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाचा जाहीर निषेध करत भाजपा युवा मोर्चाच्या वतीने बुधवारी सांगलीतील स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली.

युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक धीरज सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सुर्यवंशी म्हणाले की राज्याच्या गृहमंत्र्यांनी याप्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. आघाडी सरकारच्या काळात महिला असुरक्षित आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांने महिलावर अत्याचार केला आहे. या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली. यावेळी युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

उपाध्यक्ष नगरसेवक निरंजन आवटी, संघटन सरचिटणीस दिपक माने, किरण भोसले, सरचिटणीस अदित्य पटवर्धन, प्रथमेश वैद्य, ज्योती कांबळे, चेतन माडगूळकर, इम्रान शेख, सुजित राउत, संदीप तुपे, कृष्णा राठोड, अमित गडदे, अमित देसाई, राहुल माने, अमित भोसले, राजू माने, अक्षय पाटील, शांतीनाथ कर्वे, उदय भडेकर, सचिन ओमासे, अभिजीत सुर्यवंशी, सागर शिंदे, मिरज युवा अध्यक्ष उमेश हारगे उपस्थित होते.
 

Web Title: BJP protests: agitation against atrocities against young women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.