भाजपच्या वतीने बुधवारी जिल्ह्यात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:45 AM2021-05-05T04:45:20+5:302021-05-05T04:45:20+5:30

सांगली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता ...

BJP protests in district on Wednesday | भाजपच्या वतीने बुधवारी जिल्ह्यात निदर्शने

भाजपच्या वतीने बुधवारी जिल्ह्यात निदर्शने

Next

सांगली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत.

भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करीत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते शांततामय निदर्शने करतील. कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन होईल, असे ते म्हणाले.

Web Title: BJP protests in district on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.