मुख्यमंत्री दौऱ्याने भाजप रिचार्ज

By admin | Published: January 1, 2017 10:59 PM2017-01-01T22:59:24+5:302017-01-01T22:59:24+5:30

पाणी योजनांचे निमित्त : निवडणुकांचे नारळ फुटले

BJP Recharge BJP Chief Recharge | मुख्यमंत्री दौऱ्याने भाजप रिचार्ज

मुख्यमंत्री दौऱ्याने भाजप रिचार्ज

Next

लखन घोरपडे ल्ल देशिंग
कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे शनिवारी खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत येथील टेंभू योजना, तसेच आगळगाव सिंचन योजनेसह विविध कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. यानिमित्त कवठेमहांकाळ तालुक्यात आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नारळही फोडण्यात आले आहेत.
सध्या तासगावप्रमाणे कवठेमहांकाळ तालुक्यातही खासदार पाटील यांनी जोरदार एन्ट्री केली असून विविध विकास कामांचे नारळ फोडण्याचा धडाका लावला आहे. खासदार पाटील यांनी अगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ढालगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जोरदार कार्यक्रम घेऊन अगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.
तालुक्यात खासदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप वेगाने वाढत आहे. त्यातच मागील नगरपंचायतीच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळविले आहे. आता मात्र भाजप कवठेमहांकाळ तालुक्यात पहिल्यांदाच स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. तसेच एकाच वर्षात तब्बल दोनवेळा मुख्यमंत्री फडणवीस यांचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे या दौऱ्याचे फलित काय मिळणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
सत्ता मिळविण्यासाठी कायमच राजकारण्यांकडून पाणीप्रश्न हा कळीचा मुद्दा बनविण्यात येतो. त्याप्रमाणे आताही खासदार पाटील यांनी पाणी योजना मार्गी लावण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनाच तालुक्यात आणले. तसेच माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन, पाणी प्रश्नावर तेही आक्रमक होत आहेत. आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा गट मात्र अजून सावध पवित्र्यात आहे.
दरम्यान, ढालगाव येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जनता भाजपबरोबर राहील, असा ठाम विश्वास व्यक्त करताना, तालुक्यात पक्षाची नव्याने बांधणी करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीबरोबर घोरपडे गट एकत्र आला आहे, तर त्यांना कडवे आव्हान देण्यासाठी खासदार संजय पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर भाजपला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये तालुक्यात कितपत यश मिळणार, हे आगामी काळच ठरविणार आहे.
फूट कायम : घोरपडे भाजपपासून दूरच
खासदार संजय पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यातील दुही वाढतच चालली आहे. एकीकडे खासदार पाटील तालुक्यात जोरदार लक्ष घालत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत हाक्के यांना जवळ करीत भागात आपली पकड मजबूत करीत आहेत, तर दुसरीकडे भाजपमध्ये असूनही घोरपडे पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूरच राहत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये घोरपडे कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
 

Web Title: BJP Recharge BJP Chief Recharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.