राज्यावर तीन वर्षे भाजपचाच डल्ला : दिलीपतात्या पाटील, ‘हल्लाबोल’मधून शासनाचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:01 PM2018-04-02T23:01:29+5:302018-04-02T23:01:29+5:30
सांगली : राष्टÑवादीवर टीका करणाऱ्या भाजपनेच गेल्या तीन वर्षांत राज्यात डल्ला मारला. त्यातूनच अनेक घोटाळे आता समोर येत आहेत, अशी टीका राष्टÑवादीचे नेते दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
सांगली : राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या भाजपनेच गेल्या तीन वर्षांत राज्यात डल्ला मारला. त्यातूनच अनेक घोटाळे आता समोर येत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, ४ व ५ एप्रिल रोजी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन होत आहे. या आंदोलनातून सरकारच्या धोरणांचा, कारभाराचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. राज्यभरात आंदोलनाला जनता व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनता सरकारवर नाराज असल्याचाच हा पुरावा आहे.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करीत असताना, अनेक नियम लावून जाणीवपूर्वक कर्जमाफीत अडचणी निर्माण केल्या. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे दीड लाखांपेक्षा अधिक कर्जाची थकबाकी असल्यामुळे त्यांना या कर्जमाफीचा उपयोग झालेला नाही. शेतकºयांच्या जिल्हा बॅँकेला अडचणीत आणण्यासाठी शासनाने अनेक प्रयत्न केले.
शेतकºयांबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही अनेक प्रकारचे चुकीचे निर्णय घेण्यात आले. पेपरफुटीचे प्रकरणही याच सरकारच्या काळात घडले. इंधनात प्रचंड मोठी दरवाढ झाली. आजवरच्या इंधन दरवाढीत भाजप सरकारने विक्रम नोंदविला आहे. बेरोजगारीच्या बाबतीतही असाच विक्रम प्रस्थापित होत आहे. प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे बोगस आश्वासन सरकारने दिले. अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक घटकाला, क्षेत्राला अडचणीत आणले.
संपूर्ण राज्यभर अनागोंदी दिसत आहे. अशाप्रकारचा कारभार कधीही कोणत्या पक्षाने केला नाही. त्यामुळेच सर्व घटक आता राष्टÑवादीच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनात सहभागी होत आहेत. सांगली जिल्ह्य ात होणाºया आंदोलनासही असाच प्रतिसाद लाभेल, याची खात्री वाटते.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
देशमुखांवर आरोप
सुभाष देशमुख यांनी सोलापूर महापालिकेच्या जागेवर डल्ला मारून त्याठिकाणी घर बांधल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यावर डल्ला मारल्याचा आरोप करणे म्हणजे विनोदच आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी यावेळी केली.