जतमध्ये भाजपशी काडीमोड घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:18 AM2021-07-11T04:18:54+5:302021-07-11T04:18:54+5:30

ते म्हणाले की, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपबरोबर देशपातळीवर महायुती केली आहे. त्यामुळे आठवले यांच्या आदेशाचे ...

BJP will take a stand against Jat | जतमध्ये भाजपशी काडीमोड घेणार

जतमध्ये भाजपशी काडीमोड घेणार

Next

ते म्हणाले की, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपबरोबर देशपातळीवर महायुती केली आहे. त्यामुळे आठवले यांच्या आदेशाचे पालन करून रिपब्लिकन कार्यकर्ते जत नगरपरिषदेमध्ये भाजपच्या उमेदवारांचा मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रचार करून निवडून आणण्यासाठी सहकार्य केले. परंतु मतदानानंतर भाजपाने मित्रपक्ष म्हणून आम्हांला कधीही विचारात घेतले नाही. शिवाय निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. त्यामुळे तालुक्यातील आरपीआयचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपवर नाराज असून याचा योग्य व गांभीर्याने विचार न झाल्यास भाजपाबरोबर काडीमोड घेऊन स्वत:चे अस्तित्व दाखवून देणार आहोत.

जत शहरात प्रत्येक वाॅर्डात कार्यकर्ते व मतदान मोठ्या संख्येने आहेत. युतीचा धर्म म्हणून आम्ही जत नगरपरिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी केली होती. त्याचा विचार भाजप नेत्यांनी केला नाही. त्यामुळे रिपाइंच्या सर्व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांना भेटून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुढील वाटचाल व महायुतीची दिशा ठरवण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन साबळे यांनी केले आहे.

Web Title: BJP will take a stand against Jat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.