भाजपचे कार्यकर्ते कुरघोडीचे राजकारण मोडून काढतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:19 AM2021-07-16T04:19:18+5:302021-07-16T04:19:18+5:30

इस्लामपूर : भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा मनाने, विचाराने कणखर व स्वाभिमानी आहे. अलीकडच्या काही वर्षातील भाजपचे वाढते ...

BJP workers will break the politics of Kurghodi | भाजपचे कार्यकर्ते कुरघोडीचे राजकारण मोडून काढतील

भाजपचे कार्यकर्ते कुरघोडीचे राजकारण मोडून काढतील

Next

इस्लामपूर : भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा मनाने, विचाराने कणखर व स्वाभिमानी आहे. अलीकडच्या काही वर्षातील भाजपचे वाढते संघटन काहींच्या डोळ्यात खुपत असल्याने त्यांनी कुरघोड्यांचे राजकारण सुरू केले आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता अविचाराचे राजकारण मोडून काढेल. नवीन पदाधिकाऱ्यांनी भाजपचा विचार घराघरात पोहोचवावा, असे आवाहन नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.

वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहर व ग्रामीण भागातील भाजप पदाधिकारी निवडीच्या कार्यकमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे अध्यक्षस्थानी होते.

साळुंखे म्हणाले, निशिकांत पाटील यांच्यासारखा आपल्या मतदारसंघाला नेता लाभला आहे. कणखर विचारांचा, योग्य न्यायनिवाडा करणारा, इतरांच्या मदतीला धावणारा आणि नि:स्वार्थपणे काम करणारा हा नेता भविष्यात मतदार संघातील इतिहास बदलून टाकेल, यात शंका नाही. सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे नेतृत्व अधिक बळकट करण्यासाठी भाजप पक्षाचे विचार प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवून पक्षवाढीसाठी काम केले पाहिजे.

तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रावसाहेब पाटील यांनी आभार मानले. सुरेखा जगताप, मधुकर हुबाले, चंद्रकांत पाटील, डॉ. धनपाल वटठारे, संदीप सावंत, अशोक खोत यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस संजय हवलदार, डॉ. सतीश बापट, प्रवीण माने, सरपंच गणेश हराळे, अजित पाटील, सुभाष शिंगण, नंदकुमार कुंभार, राहुल पाटील, शरद पाटील, सुभाष चव्हाण, संदीपराज पवार, प्रवीण परीट उपस्थित होते.

Web Title: BJP workers will break the politics of Kurghodi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.