भाजपचे कोरोनाविरोधी अभियान कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:31 AM2021-08-20T04:31:26+5:302021-08-20T04:31:26+5:30
इस्लामपूर येथे भाजप वैद्यकीय आघाडीच्या कार्यशाळेत शिवाजीराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भगवानराव साळुंखे, धैर्यशील मोरे उपस्थित होते. लोकमत ...
इस्लामपूर येथे भाजप वैद्यकीय आघाडीच्या कार्यशाळेत शिवाजीराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भगवानराव साळुंखे, धैर्यशील मोरे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनासारख्या महाभयंकर आजाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान कौतुकास्पद आहे. या अभियानात देशभरातील पाच लाखांहून अधिक वैद्यकीय तज्ज्ञ काम करणार आहेत. देशाच्या २ लाख खेड्यातील नागरिकांपर्यंत पोहोचून वैद्यकीय सेवेसह कोरोनाबाबत जनजागृती केली जाणार आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
येथील प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलामध्ये भाजपच्या जिल्हा वैद्यकीय आघाडीच्यावतीने आयोजित राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाच्या कार्यशाळेचे उद्घाटन नाईक व माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्याहस्ते झाले.
साळुंखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटाचा कणखरपणे मुकाबला करतानाच जनतेलाही सोबत घेतले आहे. भाजपच्यावतीने अनेक ठिकाणी वैद्यकीय आघाडी नागरिकांना मदत करीत आहे. हे अभियान कोरोनामुक्तीच्या दृष्टीने शेवटपर्यंत प्रयत्न करेल.
वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राहुल नाकील, डॉ. ऋषिकेश मेटकरी (विटा) यांनी मार्गदर्शन केले. धैर्यशील मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विक्रम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मुशर्रफ सय्यद यांनी आभार मानले. यावेळी मधुकर हुबाले, संजय हवालदार, अशोक खोत, संदीप सावंत, स्मिता पवार, प्रवीण परीट, सुभाष जगताप, सुनील मदने, पोपट चव्हाण उपस्थित होते.