भाजपच्या बांधकाम कामगार आघाडीने घेतली राज्यपालांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:27 AM2021-01-08T05:27:10+5:302021-01-08T05:27:10+5:30

इस्लामपूर : राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अडीअडचणी आणि प्रश्नांची माहिती देण्यासाठी भाजपप्रणित बांधकाम कामगार आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल ...

BJP's construction workers alliance met the governor | भाजपच्या बांधकाम कामगार आघाडीने घेतली राज्यपालांची भेट

भाजपच्या बांधकाम कामगार आघाडीने घेतली राज्यपालांची भेट

Next

इस्लामपूर : राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अडीअडचणी आणि प्रश्नांची माहिती देण्यासाठी भाजपप्रणित बांधकाम कामगार आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यामध्ये बांधकाम कामगारांच्या योजनांसंदर्भात चर्चा झाली.

महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगारांना विश्वासामध्ये घेत नाही. ऑनलाईनच्या नावाखाली तब्बल १० लाख कामगारांची नोंदणी रद्द होणार आहे याची भीती आहे. परंतु सरकार चर्चा करायला तयार नाही. तसेच कोविड-१९ चे अर्थसहाय्य अजूनही मोठ्या प्रमाणात कामगारांना मिळाले नाही.

शिष्टमंडळाने एसटी कामगारांना स्वेच्छानिवृत्ती, बिडी कामगारांना किमान वेतन चालू करा, तसेच गावरान जमीन कायदा लागू करावा ही विनंती केली.

यावेळी भाजप कामगार आघाडीचे अध्यक्ष गणेश ताठे, उपाध्यक्ष अमित कदम, पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे, प्रमोद जाधव, सचिन पाटील, टिपू सुलतान, प्रवीण कांबळे उपस्थित होते.

फोटो-

मुंबईतील राजभवनात भाजपप्रणित बांधकाम कामगार आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी गणेश ताटे, अमित कदम, केशव घोळवे उपस्थित होते.

Web Title: BJP's construction workers alliance met the governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.