सांगली जिल्ह्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:30 PM2021-06-26T16:30:46+5:302021-06-26T16:37:11+5:30
Politics Ncp Sangli Bjp : भारतीय जनता पार्टीसह अन्य पक्षात गेलेले आमचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहकारी पुन्हा स्वगृही परतत आहेत. सांगली जिल्हातील भाजपचे जिल्हा परिषद पक्षात येऊ लागले असून पक्षप्रवेशाची आता केवळ सुरूवात झाली आहे. भाजपचे सुमारे दहा ते बारा जिल्हा परिषद सदस्य सध्या आमच्या संपर्कात असल्याने येत्या काही महिन्यात सांगली जिल्ह्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला.
विटा : भारतीय जनता पार्टीसह अन्य पक्षात गेलेले आमचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहकारी पुन्हा स्वगृही परतत आहेत. सांगली जिल्हातील भाजपचे जिल्हा परिषद पक्षात येऊ लागले असून पक्षप्रवेशाची आता केवळ सुरूवात झाली आहे. भाजपचे सुमारे दहा ते बारा जिल्हा परिषद सदस्य सध्या आमच्या संपर्कात असल्याने येत्या काही महिन्यात सांगली जिल्ह्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला.
विटा येथे युवक राष्ट्रवादी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास आले असताना त्यांनी पक्षप्रवेश देण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राष्ट्रवादीकॉँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आ. सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुशांत देवकर उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्ते व मतदारांचा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षावर विश्वास आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला आज २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापैकी १७ वर्षे पक्ष सत्तेत आहो. सध्या राष्ट्रवादी समीकरणे बदलत आहेत. गेल्या पाच ते सहा दिवसातील राष्ट्रीय घडामोडी पहाता पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना राष्ट्रवादीपातळीवर मोठी संधी मिळणार आहे.
आजपर्यंत अनेकांनी पक्षाच्या मदतीने आमदार, खासदारासह इतर पदे उपभोगली आणि विधानसभा निवडूकीच्या तोंडावर खा. शरद पवार यांची साथ सोडली. परंतु, आता ते आमचे सहकारी पक्षात परत येत आहेत. सांगली जिल्हा परिषदेचे भाजप सदस्य राष्ट्रवादी पक्षात जाहीरपणे प्रवेश करीत आहेत. सध्या एक-दोन सदस्यांनी प्रवेश केला. परंतु, आणखी १० ते १२ सदस्य आमच्या संपर्कात असून तेही भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात सांगली जिल्ह्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला.