Lok Sabha Election 2019 भाजपचा निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियावरच अधिक भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:17 PM2019-04-14T23:17:58+5:302019-04-14T23:18:17+5:30

सांगली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असतानाच प्रचारासाठीचे वेगवेगळे फंडे राजकीय पक्षांकडून वापरले जात आहेत. सध्या सर्वाधिक ...

BJP's election campaign is more focused on social media | Lok Sabha Election 2019 भाजपचा निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियावरच अधिक भर

Lok Sabha Election 2019 भाजपचा निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियावरच अधिक भर

Next

सांगली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असतानाच प्रचारासाठीचे वेगवेगळे फंडे राजकीय पक्षांकडून वापरले जात आहेत. सध्या सर्वाधिक बोलबाला असलेल्या सोशल मीडियाचाही पक्षांकडून प्रभावीपणे वापर केला जात आहे. भाजपकडून सोशल मीडियातील सर्वच माध्यमातून प्रचारावर भर दिला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची टीम मेहनत घेत आहे.
लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळ येईल तसे प्रचाराची रंगत वाढत आहे. सध्या प्रत्येकाच्या हाती असलेल्या स्मार्टफोनपर्यंत प्रचार पोहोचावा यासाठी भाजपकडून यंत्रणा कार्यरत आहे. सांगली व तासगाव या दोन्ही ठिकाणाहून भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या सोशल मीडियावरील प्रचाराची धुरा सांभाळली जात आहे.
निवडणूक आयोगानेही सोशल मीडियावरील प्रचारावर करडी नजर ठेवल्याने शपथपत्रात नमूद केलेल्या संजयकाका यांच्या सोशल मीडियावरूनच प्रचार केला जात आहे. दिवसाच्या सुरूवातीला प्रचाराच्या जाहिराती तयार केल्या जातात. नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाते. सर्वात प्रथम व्हॉटस् अ‍ॅपवर हा संदेश पाठविला जातो. यासाठी दोनशेहून अधिक ग्रुप कार्यरत आहेत. इन्स्टाग्रामवरही दररोजच्या घडामोडी दिल्या जातात. सर्वच सोशल मीडियावर भाजपचा भर दिसून येत आहे.
कशी चालते यंत्रणा?
प्रचाराच्या धामधुमीतही दिवसभरात कोणत्या पोस्ट व्हायरल करायच्या याचे नियोजन करण्यात येते.
पोस्टमध्ये प्रामुख्याने पाटील यांचा प्रचार दौरा व सभेचे वेळापत्रक प्राधान्याने दिले जाते. टष्ट्वीटरवर विकास कामांच्या पोस्ट पाठविल्या जातात.
मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या पाटील यांच्या व भाजपच्या सभा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘फेसबुक लाईव्ह’चा आधार घेतला जातो. बहुतांशवेळा पाच हजारपेक्षा अधिकजण ‘लाईव्ह’ ही सभा ऐकत असतात.

24,441
लाईक्स संजयकाका पाटील यांच्या फेसबुकवरील अधिकृत पेजला आहेत. या पेजवर दिवसातून दोन ते पाच पोस्ट शेअर केल्या जातात, तर टष्ट्वीटरवर त्यांचे २६१२ फॉलोअर्स आहेत.

26,000
जणांना पाटील यांच्या माध्यमातून व्हॉट्स अ‍ॅपचे रोज संदेश पाठवले जातात. कार्यकर्ते या पोस्ट व्हायरल करतात. अधिकाधिक शेअर होण्यासाठी प्रयत्न होतात.

Web Title: BJP's election campaign is more focused on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.