जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार निवडून येतील सुरेश खाडे : राज्यात महायुतीला बहुमत मिळेल
By admin | Published: May 18, 2014 12:13 AM2014-05-18T00:13:54+5:302014-05-18T00:14:09+5:30
मिरज : लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार निवडून येतील, असा दावा आ. सुरेश खाडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
मिरज : लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार निवडून येतील, असा दावा आ. सुरेश खाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. लोकसभा निवडणुकीत दणदणीत मताधिक्य मिळाल्याने गतवेळी दंगलीमुळे निवडून आल्याची टीका फोल असल्याचेही त्यांनी सांगितले. आ. खाडे म्हणाले, संजय पाटील यांना निवडून येण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचा मोठा परिणाम झाला. राष्ट्रवादी नेते अजितराव घोरपडे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांनी भाजपची मदत केली. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला बहुमत मिळेल व जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार निवडून येतील, असेही त्यांनी सांगितले. संजय पाटील यांच्यामुळे मिरज तालुक्यातील अनेक विकास कामे मार्गी लगणार आहेत. निवडणुकीत संभाजी पवार, प्रकाश शेंडगे हे तटस्थ राहिले. त्यांच्याबाबत नेत्यांकडे अहवाल पाठविण्यात आला असल्याचे खाडे यांनी सांगितले. भाजपच्या विजयामुळे मिरज विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुकांची संख्या कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)