मिरजेत शिवसेनेतर्फे कर्नाटकातील वाहनांवर काळे झेंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:25 AM2021-03-21T04:25:38+5:302021-03-21T04:25:38+5:30
मिरजेत बसस्थानकासमोर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बेळगाव शिवसेना जिल्हा प्रमुखांवर हल्ला करणाऱ्या ...
मिरजेत बसस्थानकासमोर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बेळगाव शिवसेना जिल्हा प्रमुखांवर हल्ला करणाऱ्या कन्नड रक्षण वेदिका व करणी सेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
बेळगाव कारवारसह मराठी भाषिक भाग संयुक्त महाराष्ट्रात घेण्यासाठी १०५ लोकांनी आहुती दिली आहे. मात्र, कानडी सरकार सीमावर्ती मराठी भाषिकांवर अन्याय करीत आहे. जबरदस्तीने कानडी लादण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कर्नाटक सरकार संरक्षण देत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केला.
यावेळी कर्नाटकातून आलेल्या व जाणाऱ्या गाड्यांवर जय महाराष्ट्र असे लिहून काळे झेंडे लावण्यात आले.
यावेळी कामगार नेते डॉ. महेशकुमार कांबळे, मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे, विशालसिंग राजपूत, महादेव मगदुम, शंभोराज काटकर, विजय शिंदे, मिरज तालुका प्रमुख सुगंधा माने, रुक्मिणी अंबिगेर, युवा सेना प्रमुख ओंकार जोशी, विजय कात्राळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.