कुपवाडमध्ये भाजपचे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:23 AM2020-12-23T04:23:02+5:302020-12-23T04:23:02+5:30

कुपवाड : शहरातील मृत्युचा सापळा बनलेल्या मिरज-माधवनगर या यशवंतनगरमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने मंगळवारी सकाळी वसंतदादा ...

Block BJP's path in Kupwad | कुपवाडमध्ये भाजपचे रास्ता रोको

कुपवाडमध्ये भाजपचे रास्ता रोको

Next

कुपवाड : शहरातील मृत्युचा सापळा बनलेल्या मिरज-माधवनगर या यशवंतनगरमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने मंगळवारी सकाळी वसंतदादा सूतगिरणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे यांनी या रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक प्रकाश ढंग, शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र सदामते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

आमदार गाडगीळ म्हणाले, शहरातील मिरज-माधवनगर हा यशवंतनगरमार्गे जाणारा रस्ता मृत्युचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत. अपघात कमी करण्यासाठी या रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसविण्याची गरज आहे.

नगरसेवक प्रकाश ढंग, विश्वजित पाटील, रवींद्र सदामते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यकारी अभियंता संतोष रोकडे यांना गाडगीळ यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. रोकडे यांनी या रस्त्यावर त्वरित गतिरोधक व रस्त्याच्या दुतर्फा इंडिकेटर कॅट आईज लावण्याचे आश्वासन दिले.

आंदोलनात नगरसेवक राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष कृष्णा राठोड, मोहन जाधव, स्वप्नील देशमुख, संदीप धरणगुत्ते, विशाल मोरे, उदय पाटील, प्रवीण चव्हाण आदी नागरिक सहभागी होते.

फोटो-२२कुपवाड०१

फोटो ओळ :

मिरज-माधवनगर या यशवंतनगरमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने मंगळवारी वसंतदादा सूतगिरणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी कार्यकारी अभियंता संतोष रोकडे यांना निवेदन दिले.

Web Title: Block BJP's path in Kupwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.