रेल्वेचा नांद्रे-सांगली दरम्यान दोन दिवस ब्लॉक, रेल्वेगाड्यांमधील बदल जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 06:29 PM2023-07-08T18:29:35+5:302023-07-08T18:34:10+5:30

प्रवाशांची गैरसोय होणार

Block of Railways on Sunday Monday between Nandra Sangli, Know the change in trains | रेल्वेचा नांद्रे-सांगली दरम्यान दोन दिवस ब्लॉक, रेल्वेगाड्यांमधील बदल जाणून घ्या

रेल्वेचा नांद्रे-सांगली दरम्यान दोन दिवस ब्लॉक, रेल्वेगाड्यांमधील बदल जाणून घ्या

googlenewsNext

मिरज : पुणे-मिरजरेल्वे मार्गावर नांद्रे-सांगली स्थानकांदरम्यान रेल्वे दुहेरीकरणासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रविवारी व सोमवारी कोयना एक्स्प्रेससह काही रेल्वेगाड्या रद्द व काही इतर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

रेल्वेमार्ग दुहेरीकरणाशी संबंधित विविध तांत्रिक कामांसाठी सोमवारी (दि. १०) पुणे-कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस, सातारा-कोल्हापूर-सातारा व सांगली-मिरज गाडी रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस दि. १० जुलैला कोल्हापूरहून सुटण्यासाठी रात्री ८:५० ऐवजी ११:०० वाजता सुटेल.

रविवारी दि. ९ रोजी गोंदियाहून सुटणारी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच येईल. ही गाडी पुणे-कोल्हापूर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. दि.१० जुलैला कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस पुण्यातून रात्री १०:२५ वाजता गोंदियाला जाईल. ही गाडी पुणे-कोल्हापूर दरम्यान रद्द राहील. कोल्हापूर-सांगली ही गाडी दि. १० जुलैला कोल्हापुरातून मिरजेपर्यंतच येईल.

दादरहून सुटणारी अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस, अहमदाबाद-कोल्हापूर एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-वास्को गोवा एक्स्प्रेस दौंड-कुर्डूवाडी-मिरजमार्गे वळवण्यात आल्या आहेत.

दि. ९ रोजी बेंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस, बेंगळुरू येथून सुटणारी पुद्दुचेरी-दादर एक्स्प्रेस व दि. १० जुलैला हुबळीहून सुटणारी हुबळी-दादर एक्स्प्रेस मिरज-कुर्डुवाडी-दौंड या पर्यायी मार्गाने धावेल. त्यामुळे रविवारी सुटीच्या दिवशी पुणे ते मिरज दरम्यान स्थानकांवरील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Web Title: Block of Railways on Sunday Monday between Nandra Sangli, Know the change in trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.