ब्लॉक, प्रगणकासाठी इतर नगरपालिकेची यंत्रणा राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:26 AM2021-03-26T04:26:07+5:302021-03-26T04:26:07+5:30

विटा : विटा नगरपरिषदेच्या २०२१-२२ सार्वत्रिक निवडणुकीसाठी ब्लॉक व प्रगणक तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी विटा नगरपालिका ...

Block, other municipal system should be implemented for enumerator | ब्लॉक, प्रगणकासाठी इतर नगरपालिकेची यंत्रणा राबवावी

ब्लॉक, प्रगणकासाठी इतर नगरपालिकेची यंत्रणा राबवावी

Next

विटा : विटा नगरपरिषदेच्या २०२१-२२ सार्वत्रिक निवडणुकीसाठी ब्लॉक व प्रगणक तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी विटा नगरपालिका प्रशासनाऐवजी इतर नगरपरिषदेची प्रशासकीय यंत्रणा राबवावी, अशी मागणी विटा शहर शिवसेनेचे विटा शहरप्रमुख राजू ऊर्फ सुधीर जाधव व माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी पत्राद्वारे केली.

गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून विटा नगरपरिषदेची सत्ता एकाच पाटील घराण्याकडे आहे. सत्तेच्या जोरावर प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत प्रशासनाला हाताशी धरून चुकीची व बेकायदेशीररीत्या आणि सत्ताधारी गटाला अनुकूल अशी प्रभाग रचना करीत असतात. सध्या २०२१-२२ मध्ये होऊ घातलेल्या विटा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ब्लॉक व प्रगणक तयार करण्याचे काम सुरू आहे.

सत्ताधारी गटाकडून प्रशासनावर दबाव आणून त्यांना अनुकूल असे काम करून घेतले जात आहे. त्यामुळे अन्य नागरिक व उमेदवारांवर अन्याय होणार आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन या कामासाठी विटा पालिकेची यंत्रणा न लावता इतर कोणत्याही नगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा तयार करून हे काम करून घ्यावे. त्यामुळे विटेकर नागरिक व सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील उमेदवारांना न्याय मिळेल, असेही सुधीर जाधव व संजय भिंगारदेवे यांनी पत्रात नमूद केले आहे.

चौकट

विटा नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूककामी २०१६-१७ मधील तयार केलेली जनगणना व ब्लॉक, प्रगणक गट रद्द केले पाहिजेत. त्यानंतर नगरपरिषदेच्या २००९च्या सुधारित मंजूर विकास आराखड्यानुसार नवीन ब्लॉक व प्रगणक गट तयार करावेत, अशी मागणीही सुधीर जाधव व संजय भिंगारदेवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Web Title: Block, other municipal system should be implemented for enumerator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.