इस्लामपुरात अन्यायी वीज तोडणीविरोधात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:26 AM2021-03-27T04:26:41+5:302021-03-27T04:26:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत आहेत. आम्हाला ताब्यात घेण्यापेक्षा वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत आहेत. आम्हाला ताब्यात घेण्यापेक्षा वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना रोखा, असा इशारा भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट महाडिक यांनी शुक्रवारी दिला.
वाळवा पंचायत समितीसमोर भाजपने रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हा परिषदेचे सभापती जगन्नाथ माळी, सागर खोत, जि. प. सदस्य निजाम मुलाणी, पं. स. समिती सदस्य मारुती खोत, इस्लामपूर शहराध्यक्ष अशोक खोत, सी. एच. पाटील, डॉ. सचिन पाटील, नगरसेवक अमित ओसवाल, चेतन शिंदे, सतीश महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, यावेळी सरकार आणि वीज वितरण कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी केली. इस्लामपूर-सांगली मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
महाडिक म्हणाले, शेतीला पाण्याची आवश्यकता असताना वीज तोडली जाते. हा प्रकारच अन्यायकारक आहे.
यावेळी धनाजी पाटील, सरगम मुल्ला, हर्षवर्धन पाटील, प्रवीण चिकुर्डेकर, जलाल मुल्ला उपस्थित होते.
चौकट :
कार्यालयाला टाळे ठोकू
शेतकऱ्यांची वीज तोडणी करणाऱ्या प्रत्येक विभागातील कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे सम्राट महाडिक यांनी सांगितले.