राज्य सरकारच्या निषेधार्थ ‘स्वाभिमानी’चा शुक्रवारी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:25 AM2021-03-18T04:25:56+5:302021-03-18T04:25:56+5:30

इस्लामपूर : राज्यातील घरगुती आणि शेती पंपाची वीज बिले थकलेली असली तरी वीज कनेक्शन तोडली जाणार नाहीत, असे आश्वासन ...

Block Swabhimani on Friday in protest of the state government | राज्य सरकारच्या निषेधार्थ ‘स्वाभिमानी’चा शुक्रवारी रास्ता रोको

राज्य सरकारच्या निषेधार्थ ‘स्वाभिमानी’चा शुक्रवारी रास्ता रोको

Next

इस्लामपूर : राज्यातील घरगुती आणि शेती पंपाची वीज बिले थकलेली असली तरी वीज कनेक्शन तोडली जाणार नाहीत, असे आश्वासन देत घुमजाव करणाऱ्या राज्य सरकार आणि वीज वितरण कंपनीचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे १९ मार्च रोजी संपूर्ण राज्यभरात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. एस. यु. संदे यांनी दिली.

कोरोना काळातील वीज बिल माफ करण्याचे, तसेच कनेक्शन न तोडण्याचे वचन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात दिले होते. मात्र, शेवटच्या दिवशी सरकारने घुमजाव करीत थकबाकीदार वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याचाच आदेश दिला, हे निषेधार्ह आहे. लॉकडाऊनमुळे सगळीकडेच बेरोजगारी पसरली. शेतकरी वर्ग तर पूर्ण उद्ध्वस्त झाला. त्यामुळे या वीज जोडणी तोडण्याला कडाडून विरोध केला जाणार आहे.

Web Title: Block Swabhimani on Friday in protest of the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.