जिल्ह्यात ३६ ‘पॉर्इंट’वर नाकाबंदी, ‘वॉरंट’मधील ३० जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 02:38 PM2017-12-24T14:38:58+5:302017-12-24T14:39:16+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेला गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी शुक्रवारी रात्रीअखेर पोलिस रस्त्यावर उतरले. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ३६ ‘पॉर्इंट’वर नाकाबंदी करुन गुन्हेगारांची धरपकड केली. यामध्ये दारुच्या नशेत वाहन चालविणारे १२ तळीराम सापडले. ‘वॉरंट’मधील ३० संशयित सापडल्याने त्यांना अटक केली.
सांगली : गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेला गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी शुक्रवारी रात्रीअखेर पोलिस रस्त्यावर उतरले. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ३६ ‘पॉर्इंट’वर नाकाबंदी करुन गुन्हेगारांची धरपकड केली. यामध्ये दारुच्या नशेत वाहन चालविणारे १२ तळीराम सापडले. ‘वॉरंट’मधील ३० संशयित सापडल्याने त्यांना अटक केली.
जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘आॅल आऊट’ नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. रात्री आडेआठ ते साडेदहा या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच जिल्ह्यातील महामार्ग व संवेदनशील परिसर अशा ३६ ‘पॉर्इंट’वर नाकाबंदी लावली होती. यामध्ये ५१ पोलिस अधिकारी, ३८५ कर्मचारी व १७ शस्त्रधारी पोलिस सहभागी झाले होते.
कारागृहातून जामिनावर सुटलेले २३ तसेच रेकॉर्डवरील ४८ गुन्हेगारांना पकडून त्यांची अंगझडती घेतली. ते सध्या कुठे राहतात? काय करतात? याबद्दल चौकशी करण्यात आली. न्यायालयाने पकड वॉरंट काढूनही न्यायालयात हजर न होणारे ३० संशयित आरोपी सापडले. संशयितरित्या फिरणाºया दोघांना अटक केली. तसेच जिल्ह्यातून तडीपार केलेला एक संशयित सापडला.
त्याच्याविरुद्ध तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कोल आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ५३ वाहनधारकांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्याकडून १४ हजारांचा दंड वसूल केला. दारूच्या नशेत वाहन चालविणारे १२ तळीराम सापडले.