जिल्ह्यात ७३ ‘पॉर्इंट’वर नाकाबंदी

By admin | Published: April 24, 2017 11:45 PM2017-04-24T23:45:38+5:302017-04-24T23:45:38+5:30

वाहनधारकांची धरपकड : पावणेचार लाखांचा दंड वसूल; बेशिस्त वाहनांवर कारवाई

Blockade on 73 'points' in the district | जिल्ह्यात ७३ ‘पॉर्इंट’वर नाकाबंदी

जिल्ह्यात ७३ ‘पॉर्इंट’वर नाकाबंदी

Next



सांगली : सांगली, मिरजेसह जिल्ह्यात सोमवारी पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार ६८५ वाहनधारकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून तीन लाख ७० हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातही नाकाबंदी मोहीम राबविली होती. परंतु सोमवारी ही मोहीम आणखी तीव्र राबविण्यात आली.
कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी परिक्षेत्रात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनासाठी शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणी व महामार्गावर तसेच ग्रामीण भागातील मार्गावरील विविध चौक, पूल, बायपास रस्ते, महत्त्वाची जंक्शन या ठिकाणी सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ या वेळेत नाकाबंदी करण्यात आली होती. गेल्या आठवड्यापासून ही मोहीम सुरु आहे. सांगलीसह कोल्हापूर, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यात नाकाबंदी सुरू होती. मंगळवारीही नाकाबंदी केली जाणार आहे. आठवड्यातून दोनवेळा अशाप्रकारची कारवाई सुरू ठेवली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)
पाचशेहून अधिक पोलिस तैनात
जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्यासह पोलिस फौजफाटा सोमवारी रस्त्यावर उतरला होता. ६ उपअधीक्षक, ४ पोलिस निरीक्षक, १९ सहाय्यक पोलिस निरीक्षक, २५ उपनिरीक्षक, ४६० पोलिस शिपाई नाकाबंदीच्या कारवाईत सहभागी झाले होते. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांची यंत्राद्वारे तपासणी करून कारवाई करण्यात आली. सोमवारच्या नाकाबंदीसाठी पॉर्इंटची संख्या वाढविण्यात आली होती. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ७३ पॉर्इंटवर नाकाबंदी सुरू होती.

Web Title: Blockade on 73 'points' in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.