संजयनगर येथे १०१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:09+5:302021-05-03T04:22:09+5:30
संजयनगर : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सांगलीतील संजयनगर येथे आधार यूथ फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ...
संजयनगर : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सांगलीतील संजयनगर येथे आधार यूथ फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १०१ युवकांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन सांगली शहर व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व संजयनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक काकासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी नगरसेवक सुभाष गोयकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी अभिषेक गोयकर म्हणाले की, आधार यूथ फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. फाउंडेशनतर्फे कोविड सेंटरमध्ये दाखल रुग्णांच्या नातेवाइकांना दररोज भोजन पाेहाेचविले जात आहे.
यावेळी अशोक म्हारगुडे, दिनेश माने, संजयनगर पोलीस निरीक्षक महेश डोंगरे, रमेश खामकर आदी उपस्थित होते.
फोटो : ०२डी १
ओळ : संजयनगर येथे आधार यूथ फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी काकासाहेब पाटील, पृथ्वीराज पाटील, सुभाष गोयकर, अभिषेक होळकर, अशोक म्हारगुडे आदी उपस्थित होते.