सम्राट महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपुरात १६५ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:25 AM2020-12-22T04:25:53+5:302020-12-22T04:25:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथे युवा नेते सम्राट महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्ताने महादेवनगर परिसरात महाडिक युवाशक्ती, इस्लामपूरचे अध्यक्ष सुजित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथे युवा नेते सम्राट महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्ताने महादेवनगर परिसरात महाडिक युवाशक्ती, इस्लामपूरचे अध्यक्ष सुजित थोरात व मित्र परिवार यांच्यावतीने महारक्तदान शिबिर व कोविड योद्ध्यांचा सन्मान समारंभ आयोजित केला होता. इस्लामपूर शहरातील विक्रमी १६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, आधार फौंडेशनचे डॉ. योगेश वाठारकर यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राहुल महाडिक म्हणाले, राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा असताना, वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, हे सामाजिक भान महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी जपले आहे. त्याचबरोबर कोरोना काळात ज्यांनी इस्लामपूर शहरात स्वत:ची काळजी न करता झोकून देऊन काम केले, त्या नगरपालिका कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याची पोचपावती दिल्यासारखे आहे. डॉ. योगेश वाठारकर म्हणाले, युवाशक्तीचे काम समाजाच्या हिताचे राहिलेले आहे. कोरोना काळात महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी केलेली मदत मोलाची होती.
यावेळी कोरोनाची परिस्थिती असतानाही इस्लामपूर शहरातील विक्रमी १६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी महाडिक शिक्षण संकुलाचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी, नगरसेवक कपिल ओसवाल, सतीश महाडिक, अमित ओसवाल, महेश पाटील, चेतन शिंदे, पलूसचे नगरसेवक नितीन जाधव, व्यापारी संघटनेचे मोहन पाटील, वडार समाजाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाटेगावकर, विशाल शिंदे, सत्यवान रास्कर, जलाल मुल्ला, मन्सूर वाठारकर, चंद्रशेखर तांदळे, सतीश पवार, रवींद्र वीरकर, मयूर शेजाळ व युवाशक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवाशक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात यांनी संयोजन केले. वीरेंद्र राजमाने यांनी प्रास्ताविक केले. धीरज कबुरे यांनी आभार मानले.
फोटो - २११२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूर रक्तदान शिबिर
इस्लामपूर येथे युवा नेते सम्राट महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्ताने महादेवनगर परिसरात रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी राहुल महाडिक, डॉ. योगेश वाठारकर, प्रा. महेश जोशी, कपिल ओसवाल, सतीश महाडिक, अमित ओसवाल, सुजीत थोरात उपस्थित होते.