इस्लामपुरातील शिबिरात २२६ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:23 AM2021-01-02T04:23:13+5:302021-01-02T04:23:13+5:30
इस्लामपूर : येथील यल्लमा चौकातील श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित शिबिरात २२६ जणांनी रक्तदान केले. कोरोनाच्या ...
इस्लामपूर : येथील यल्लमा चौकातील श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित शिबिरात २२६ जणांनी रक्तदान केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्त टंचाईवर मात करण्यासाठी तरुणाईने नवीन वर्षाच्या पहिल्याचदिवशी चांगला प्रतिसाद दिला.
पाच वर्षांपूर्वीपासून नववर्षाचे स्वागत रक्तदानाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक आनंदराव पवार यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. ते म्हणाले, रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन नवे नाते निर्माण करण्यासाठी रक्तदान शिबिरे उपयुक्त ठरतात. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण एकमेकांना भेटतो; पण आज रक्तदानाने दिलेल्या रक्ताच्या एका पिशवीतून चार रुग्णांना आयुष्याची भेट दिली गेली.
राजारामबापू रक्तपेढी आणि यशवंतराव चव्हाण रक्तपेढी, कऱ्हाड यांच्यावतीने रक्त संकलित करण्यात आले. मंडळाचे सदस्य पुजारी धोंडीराम घोरपडे, भाऊ पाटील, श्रीकांत काळे, श्यामजी पटेल, डॉ. दिलीप साळुंखे, डॉ. उदय माने, संदीप पवार, विजय घोरपडे, विजय धुमाळे, तुषार खंडागळे, प्रीतम काळे, शिवराज पुजारी, सूरज पन्हाळकर, गणेश खंडागळे यांनी संयोजन केले. संदेश शहा व प्रशांत घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो-
इस्लामपूर येथील यल्लमा चौकात रक्तदात्यांचा सत्कार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी
धोंडीराम घोरपडे, भाऊ पाटील, श्यामजी पटेल उपस्थित होते.