पडवळवाडीत ६० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:33 AM2021-09-10T04:33:04+5:302021-09-10T04:33:04+5:30

वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी जन्म शताब्दी वर्षानिमित्त गौरव नायकवडी युवा शक्तीतर्फे पडवळवाडी ता. वाळवा येथे रक्तदान ...

Blood donation of 60 people in Padwalwadi | पडवळवाडीत ६० जणांचे रक्तदान

पडवळवाडीत ६० जणांचे रक्तदान

Next

वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी जन्म शताब्दी वर्षानिमित्त गौरव नायकवडी युवा शक्तीतर्फे पडवळवाडी ता. वाळवा येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिरात ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यांना युवा शक्ती व शाश्वत ब्लड बँक मिरज यांच्या वतीने प्रमाणपत्र व वाफेचे मशीन देण्यात आले.

हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांच्या हस्ते क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचा प्रारंभ केला. यावेळी गौरव नायकवडी यांनी रक्तदान कसे सर्वश्रेष्ठ दान आहे, याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी प्रमिला यादव, उपसरपंच कमल यादव, ग्रामपंचायत सदस्य मारूती यादव, अतुल कोकाटे, हुतात्मा दूध संघाचे संचालक वैभव खोत, संजय खोत उपस्थित होते.

रक्तदान शिबिर संयोजन गौरवभाऊ नायकवडी युवा शक्ती सदस्य आदित्य मुळीक, प्रज्वल कदम, प्रथमेश शेळके, यश पाटील, वैभव यादव यांनी केले. अशपाक वलांडकर, ऋषिकेश कुलकर्णी, सरफराज वलांडकर, अनिकेत कोकाटे, केदार खोत, सौरभ जाधव, शाकिब मुलाणी यांनी रक्तदान केले.

Web Title: Blood donation of 60 people in Padwalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.