चिंचणी येथे आज रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:19 AM2021-07-16T04:19:01+5:302021-07-16T04:19:01+5:30
कडेगाव : लोकमत परिवार आणि विश्वजितेश फाउंडेशनतर्फे चिंचणी (ता. कडेगाव) येथील लोकनेते मोहनराव कदम सभागृहात, शुक्रवार, दि. ...
कडेगाव : लोकमत परिवार आणि विश्वजितेश फाउंडेशनतर्फे चिंचणी (ता. कडेगाव) येथील लोकनेते मोहनराव कदम सभागृहात, शुक्रवार, दि. १६ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर होणार आहे. युवा नेते डॉ. जितेश कदम यांच्याहस्ते सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. यावेळी कडेगावच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, चिंचणी (वांगी) ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. पौर्णिमा श्रुंगारपुरे, चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संतोष गोसावी उपस्थित राहणार आहेत. शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना रक्तपेढीचे प्रमाणपत्र, स्मार्ट कार्ड, ‘लोकमत’च्यावतीने प्रशस्तीपत्र आणि विश्वजितेश फाउंडेशनच्यावतीने भेटवस्तू देण्यात येणार आहे.
रक्तदान करण्यासाठी नोंदणी करण्याकरिता प्रताप महाडिक : ९५२७४९७७७७, अजय पाटील : ९९२२६९४७७७ यांच्याशी संपर्क करावा.
चौकट
तरुणाईने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे : जितेश कदम
कोरोनाकाळात रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून, जनतेने विशेषतः तरुणाईने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन युवा नेते डॉ. जितेश कदम यांनी केले आहे.
फोटो : जितेश कदम यांचा फोटो व कोट वापरावा