भिलवडी येथे आज ‘रक्तदान महायज्ञ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:34+5:302021-07-12T04:17:34+5:30
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे ‘लोकमत’ व भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयातर्फे सोमवार दि. १२ जुलैला रक्तदान ...
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथे ‘लोकमत’ व भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयातर्फे सोमवार दि. १२ जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान महायज्ञात सहभागी होण्याचे आवाहन ‘लोकमत’ व बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांनी केले आहे.
कोरोना संसर्गामुळे राज्यभर रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत’ने २ जुलैपासून ‘रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय रक्तदान महायज्ञास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भिलवडी शिक्षण संकुलातील बाबासाहेब चितळे महाविद्यालयात सोमवारी (दि. १२) सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. चितळे उद्योग समूह, बॉम्बे ब्लड ग्रुप, जायंट्स ग्रुप, कृष्णाकाठ फाउंडेशन, व्यापारी संघटना, भिलवडी व परिसरातील ग्रामपंचायती आदींसह विविध सेवाभावी संस्था, मंडळे सहभागी होत आहेत. नागरिकांनी शिबिरात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.