मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 02:21 AM2018-12-09T02:21:40+5:302018-12-09T02:21:57+5:30
पत्नीला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या माहेरच्या मंडळींनी ज्ञानेश्वर गोपाळ बामणे (वय ४०, रा. बसर्गी, ता. जत) या जावयाचा लाकडी खांबाला डांबून बेदम मारहाण करून निर्घृण खून केला.
सांगली : पत्नीला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या माहेरच्या मंडळींनी ज्ञानेश्वर गोपाळ बामणे (वय ४०, रा. बसर्गी, ता. जत) या जावयाचा लाकडी खांबाला डांबून बेदम मारहाण करून निर्घृण खून केला. सावळी (ता. मिरज) येथे शनिवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. ज्ञानेश्वरने लोखंडी पाईप डोक्यात घातल्याने त्याची पत्नी गीतांजली (३०) ही गंभीर जखमी झाली आहे.
ज्ञानेश्वर याचा विवाह दहा वर्षांपूर्वी सावळीतील अण्णासाहेब गंगाराम शिंदे यांची मुलगी गीतांजली हिच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना आदित्य (११) व पार्थ (८ वर्षे) अशी दोन अपत्ये झाली. सावळीत उरूस सुरूआहे. यासाठी ज्ञानेश्वर कुटुंबासह आला होता. शुक्रवारी रात्री किरकोळ कारणावरून त्याचा पत्नी गीतांजलीसोबत वाद झाला. त्यानंतर तो आॅर्केस्ट्राचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला. कार्यक्रम झाल्यानंतर रात्री साडेबारा वाजता तो घरी आला. गीतांजली झोपली होती. त्याने तिच्यासोबत झालेल्या वादाचा रागातून लोखंडी पाईपने तिच्या डोक्यावर प्रहार केला. ती किंचाळताच वडील गंगाराम शिंदे व घरातील अन्य लोकानी धाव घेतली. पकडुन त्याला बेदम मारहाण केली.