मालगावच्या जयहिंद सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:39+5:302021-01-01T04:18:39+5:30

जयहिंद सोसायटीच्या मनमानी व गैरकारभाराविरोधात माजी अध्यक्ष सदानंद कबाडगे, राम चव्हाण, महेश सलगरे यांच्यासह इतर सभासदांनी ...

Board of Directors of Jayhind Society of Malgaon dismissed | मालगावच्या जयहिंद सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त

मालगावच्या जयहिंद सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त

googlenewsNext

जयहिंद सोसायटीच्या मनमानी व गैरकारभाराविरोधात माजी अध्यक्ष सदानंद कबाडगे, राम चव्हाण, महेश सलगरे यांच्यासह इतर सभासदांनी चौकशीची मागणी केली होती. चौकशीत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीचा नोकरदारास लाभ देणे, रक्कम न भरता कर्जवसुलीसाठी ओटीएसचा लाभ मिळवून देणे, पात्र सभासदांना कर्जमाफीपासून वंचित ठेवणे, थकीत सभासदास कर्ज नसल्याचे दाखले देणे, पोटरक्कम नियमबाह्य शिल्लक ठेवणे, थकबाकीदारास नियमबाह्य कर्ज देणे, भरलेल्या कर्जाच्या रकमेत संगनमताने अपहार करणे, धान्य विभागाची रक्कम बँकेत भरणा न करणे, मान्यतेशिवाय शेअर्स रक्कम परस्पर देणे असे चौकशीत गंभीर गैरप्रकार उघडकीस आले आहेत.

उपनिबंधकांनी सचिव व कर्मचाऱ्यांकडून अपहाराच्या रकमा वसूल करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे गैरव्यवहाराने सोसायटी गाजत असताना, तीन संचालक अपात्र ठरल्याने अल्पमतात आलेले संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले.

चौकट

भ्रष्टाचारविरोधी लढ्याला यश

जयहिंद विकास सोसायटीच्या चौकशीत संचालकांनी बेधुंदपणे केलेल्या भ्रष्ट कारभाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली. उपनिबंधकांनी गैरकारभाराची दखल घेऊन तसेच तीन संचालक अपात्र ठरल्याने अल्पमतातील संस्थेचे बेजबाबदार संचालक मंडळ बरखास्त केल्याने आमच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याला यश आल्याचे मत सदानंद कबाडगे यांनी व्यक्त केले.

Web Title: Board of Directors of Jayhind Society of Malgaon dismissed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.