दुधगाव बधाऱ्यात मृतदेह ३६ तासानंतरही अडकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:27 AM2021-04-08T04:27:57+5:302021-04-08T04:27:57+5:30
दुधगाव : दुधगाव (ता. मिरज) येथील वारणा नदीवरील बंधाऱ्यात सोहेल दस्तगीर शेख (वय १८, रा. सावळवाडी, ता. मिरज) या ...
दुधगाव : दुधगाव (ता. मिरज) येथील वारणा नदीवरील बंधाऱ्यात सोहेल दस्तगीर शेख (वय १८, रा. सावळवाडी, ता. मिरज) या तरुणाचा मंगळवारी बुडून मृत्यू झाला होता. या घटनेला ३६ उलटूनही सोहेलचा बंधाऱ्यात अडकलेला मृतदेह बाहेर काढता आला नाही. बुधवारी दिवसभर आपत्कालीन मदत पथकाने मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश न आल्याने सायंकाळी ही मोहीम थांबविण्यात आली.
साेहेल मंगळवारी काही मित्रांसोबत दुधगावमध्ये पाेहायला शिकत हाेता. बंधाऱ्यावरून कॅन हातात घेऊन त्याने पाण्यात उडी मारली. मात्र, अचानक कॅन त्याच्या हातातून निसटून पाण्यावर आला, तर सोहेल पाण्यात बुडाला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण बंधाऱ्याच्या दगडात अडकल्याने साेहेलचा मृत्यू झाला.
बुधवारी दिवसभर सांगली, कोल्हापूर, औदुंबर व हरिपूर येथील आपत्कालीन मदत पथकाच्या सदस्यांनी मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा प्रवाह जास्त वेगाने असल्याने मृतदेह काढण्यात अडचण निर्माण होत होती. यावेळी स्थानिक नागरिकही मदतीसाठी बंधाऱ्यावर गर्दी केली होती. आता गुरुवारी सकाळी मृतदेह बाहेर काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत.