बोलवाड गाव झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:33 AM2021-06-09T04:33:07+5:302021-06-09T04:33:07+5:30
पूर्व भागातील अनेक गावे कोरोनाचे हॉटस्पॉट झाली होती. मिरज शहरापासून चार किलोमीटर अंतरावर तीन हजार लोकसंख्या असलेले बोलवाड गावातसुद्धा ...
पूर्व भागातील अनेक गावे कोरोनाचे हॉटस्पॉट झाली होती. मिरज शहरापासून चार किलोमीटर अंतरावर तीन हजार लोकसंख्या असलेले बोलवाड गावातसुद्धा कोरोना रुग्ण वाढले होते. जवळपास ९९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. गेल्या वीस दिवसांत नवीन एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.
गावात ‘माझे गाव माझी जबाबदारी’ अंतर्गत सरपंच सुहास आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून जनजागृती केली. तसेच गावात माजी सैनिकांचे पथक तयार करून गाव बंद केले. संपूर्ण गावात औषध फवारणी करून गावात कोरोना आजाराची जनजागृती केली.
आशा वर्कर्सनी घराघरात फिरून सर्व्हे केला. स्वतः सरपंचांनी गावात स्पीकरवरून नागरिकांना सूचना केल्या. तसेच गावातच विलगीकरण कक्ष निर्माण केला. बाहेरून गावात येणाऱ्या नागरिकांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन केले. त्यामुळे गाव पूर्ण कोरोनामुक्त झाले. गेल्या वीस दिवसांत नवीन एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. त्यामुळे मिरज तालुक्यातील बोलवड या गावाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
कोट
तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपत्ती व्यवस्थापन समितीची चार वेळा बैठक घेऊन मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्येकाची समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढला. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानेच आम्ही बोलवाड गाव कोरोनामुक्त करू शकलो.
- सुहास पाटील, सरपंच