महापालिकेकडून पुस्तक बँक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:35 AM2020-12-30T04:35:15+5:302020-12-30T04:35:15+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रातील नागरिकांना वाचनाची मेजवानी देण्याच्या उद्देशाने प्रशासनाकडून पुस्तक बँक सुरू केली जात आहे. या पुस्तक बँकेत ...
सांगली : महापालिका क्षेत्रातील नागरिकांना वाचनाची मेजवानी देण्याच्या उद्देशाने प्रशासनाकडून पुस्तक बँक सुरू केली जात आहे. या पुस्तक बँकेत नागरिकांनी पुस्तके दान करावीत, असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
महापालिकेच्या वि. स. खांडेकर वाचनालयाबरोबर अन्य वाचनालयाचे आधुनिकीकरण केले जात आहे. त्यामुळे या वाचनालयामध्ये वाचकांना पुस्तकांचा खजाना उपलब्ध व्हावा या उद्देशाने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा याअंतर्गत महापालिकेने पुस्तक दान सर्वश्रेष्ठ दान हा उपक्रम हाती घेतला आहे. वापरात नसलेल्या पुस्तकांचा इतर लोकांना आणि विद्यार्थ्यांना उपयोग होण्यासाठी महापालिकेचे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, महापालिकेच्या पुस्तक बँकेत आपली पुस्तके दान करावीत, असे आवाहनही कापडणीस यांनी केले आहे.