राजकारणाचे बाळकडू मला बोरगावने दिले;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:21 AM2020-12-07T04:21:15+5:302020-12-07T04:21:15+5:30
बोरगाव : राजकारणाचे बाळकडू मला बोरगावनेे शिकविले. राजकारणाचा पाया व मुहूर्तमेढही मी इथेच राेवली. मी आज जो आहे तो ...
बोरगाव : राजकारणाचे बाळकडू मला बोरगावनेे शिकविले. राजकारणाचा पाया व मुहूर्तमेढही मी इथेच राेवली. मी आज जो आहे तो व माझ्यातील शहाणपणा आहे तो याच पांढरीने मला शिकविल्याचे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
सावकरदादा उद्योग समूहाचे संस्थापक अशोकराव पाटील यांच्या ६३ व्या जयंतीनिमित्त आयाेजित कार्यक्रमात पाटील बोलत होत. कार्यक्रमाच्या सुरूवातीस अशोकराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नूतन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचा, तसेच धनगर नेते म्हणून निवड झाल्याबद्दल चिमण डांगे यांचा सत्कार उद्योग समूहातर्फे जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
पाटील म्हणाले, मी कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील जिवाभावाचे सहकारी गमावले, ही खंत मनात सदैव राहील. अशोकराव पाटील हे प्रामाणिक, नि:स्वार्थी व रोखठोक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने बोरगावच्या राजकारणात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून निघणे कठीण असले तरी, सर्वांनी त्यांचे चिरंजीव धैर्यशील पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहून सहकार्य करू. आधुनिक शिक्षण प्रणाली, नवीन धोरणे, त्यातील सुधारणा व शिक्षकांचे प्रश्न यासाठी काम करून आसगावकरांनी वेगळा ठसा उमटवावा.
प्रास्ताविक धैर्यशील पाटील यांनी केले. दीपक चौधरी यांनी स्वागत केले. दत्तात्रय साले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विनायकराव पाटील विजयबापू पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, कार्तिक पाटील, उदयसिंह शिंदे, माणिक पाटील, अरुण नलवडे, उदय पाटील, विकास पाटील, मानसिंग पाटील, उल्हास घाडगे, सर्जेराव देशमुख, युवराज कांबळे, सखाराम शिंदे उपस्थित होते.
फाेटाे : ०६ बाेरगाव १