बोरगावला कोरोनाचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:25 AM2021-04-17T04:25:44+5:302021-04-17T04:25:44+5:30
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथे एकाच दिवसात कोरोनाचे २० कोरोना रुग्ण आढळले तर दोघांचा मृत्यू झाला. आजअखेर ...
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथे एकाच दिवसात कोरोनाचे २० कोरोना रुग्ण आढळले तर दोघांचा मृत्यू झाला. आजअखेर प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत १२४ रुग्ण आहेत. त्यातील ७७ उपचाराखाली, तर ४७ रुग्ण बरे झाले आहेत.
गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शंभरी पार केली आहे. अनेक कुटुंबांतील कर्ती-धर्ती मंडळी यात दगावली आहेत, तरीदेखील गाव मात्र याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत व प्रशासकीय यंत्रणा कोणाचा वाईटपणा घ्यायचा म्हणून याकडे दुर्लक्ष करत आहेत. गावात कोणाचा वचक राहिलेला नाही. कोरोना रुग्ण गावात मोकाट फिरत आहेत. ज्या भागात कोरोना रुग्ण सापडलेत तो भाग सीलही केला जात नाही. त्यामुळे गावाला कोरोनाचा धोका वाढला आहे.
कोट
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरणबाबत जनजागृती व ठोस उपाययोजना करत आहोत. काही मंडळी नियमांचे उल्लंघन करून कोरोनाचा प्रसार करत आहेत. ते थांबायला हवे. कोरोना रुग्णांना आरोग्य केंद्रांतच आयसोलेट करून उपचार देऊन उपाययोजना करत आहोत.
- डॉ. चेतना साळुंखे, वैद्यकीय अधिकारी
कोट
आजच ग्रामपंचायत दक्षता समितीची बैठक घेतली असून कोरोना रुग्ण किंवा त्या कुटुंबातील कोणी व्यक्ती १५ दिवस गावात फिरताना दिसल्यास दंडात्मक कारवाई करणार आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांच्या घरावर भित्तीपत्रकही लावण्यात येणार असून ग्रामस्थांनी या मोहिमेस सहकार्य करावे.
- शकील मुल्ला, उपसरपंच